Nashik Graduate Constituency Election | नॉट रिचेबल असलेल्या शुभांगी पाटील माध्यमांसमोर येताच म्हणाल्या…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Graduate Constituency Election | नाशिक पदवीधर मतदार संघात डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाच्या आदेशाविरोधात जात अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आपल्या मुलाला अर्थात सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर डॉ. तांबे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीकडून पाठिंब्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच, नाशिक पदवीधर मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या शुभांगी पाटील यांनी आज (दि.१६) मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात त्यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यावर मातोश्रीतून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच यावेळी शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांची देखील भेट घेतली. त्यानंतर अचानक त्या नॉट रिचेबल झाल्या. त्यावर आज (दि.१६) विभागीय आयुक्त कार्यालयात आल्या असता त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले. (Nashik Graduate Constituency Election)

माध्यमांशी बोलताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, मी नुकतीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. नाना पटोले, अजित पवार आणि जयंत पाटील हे पक्षश्रेष्ठी देखील मला पाठिंबा देतील. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर करतील असंही शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मी माघार घेतलेली नाही, घेणार नाही. असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. (Nashik Graduate Constituency Election)

दरम्यान, त्यांना नॉट रिचेबल विषयी विचारलं असता, ‘तुम्ही जे काही विचारत आहात त्याबद्दल काहीही न बोललेलंच बरं असं देखील त्या म्हणाल्या.’ तसेच सत्यजीत तांबे यांच्याविरोधात असलेल्या त्यांच्या लढतीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, ‘ही लढाई जनशक्ती विरूध्द धनशक्ती आहे. जनताच ठरवेल की जनशक्तीला निवडून द्यायचे की धनशक्तीला. तसेच या मुकाबल्यात जनशक्ती जिंकेल की धनशक्ती हे दोन तारखेला ठरेल.’ असेही यावेळी बोलताना शुभांगी पाटील म्हणाल्या. (Nashik Graduate Constituency Election)

नक्की कोण आहेत शुभांगी पाटील?

शुभांगी पाटील यांनी बीए. एम.ए. बी.एड. आणि एलएलबी या पदव्या घेत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
शुभांगी पाटील या धुळ्यातील भास्कराचार्य संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशन ही संस्था त्यांनी स्थापन केली.
शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत. (Nashik Graduate Constituency Election)

शुभांगी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न होत्या. त्यानंतर पुढे जात २१ सप्टेंबर २०२२ ला शुभांगी पाटील
यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला.
भाजपाने जेव्हा सत्यजीत तांबेंच्या माध्यमातून आपली चाल खेळली तेव्हा शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीशी
संपर्क केला. त्यानंतर आता हा मुकाबला तगडा होणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title :- Nashik Graduate Constituency Election | what is the first comment on shubhangi patil after she came to nashik office what did she say about not reachable

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Graduate Constituency | अखेर काँग्रेस पक्षाकडून सत्यजीत तांबे यांचे निलंबन

Pune Crime News | पुण्यात मांजामुळे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रुग्णालायत उपचार सुरु

Nana Patole | ‘बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला..’, नाना पटोलेंचा इशारा