Pune Crime News | पुणे : खवले मांजराच्या तस्करीप्रकरणी 6 आरोपींना वनकोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- Pune Crime News | जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील (Forest Department) वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे मंगळवारी (दि. 13) खवले मांजर (इंडियन पँगोलीन) या शेड्युल 1 मधील वन्यप्राण्याची तस्करी केल्या प्रकरणात 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी 6 आरोपींना 17 फेब्रुवारी पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. (Pune Crime News)

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रोहिदास पंढरीनाथ कुळेकर (वय 55), कांताराम सखाराम वाजे (वय 49 दोघे रा. भोमाळे ता. खेड), सखाराम बबन मराडे (वय 43, रा. पाभे ता. खेड), सागर पुनाजी मेमाणे (वय 31 रा. तळेराण ता. जुन्नर), जालिंदर कान्डु कशाळे (वय 65 रा. बडेश्वर ता. मावळ), गीता नंदकुमार जगदाळे (रा. चव्हाणवस्ती कुमठे ता. कोरेगाव जि. सातारा), शांताराम सोमनाथ कुडेकर (वय ३२ रा. करंजाळे ता. जुन्नर) असे एकूण 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी 6 आरोपीना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारी पर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.

ही कार्यवाही पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड
वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी केली.

वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैद्य वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी
तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर 1926 या क्रमांकावर संर्पक साधून माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन
सहायक वनसंरक्षक संदेश पाटील यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पाच मिनिटात लाईटचे काम करुन दे, काका-पुतण्याला टिकावाने मारहाण

Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांचे थेट उत्तर; ”हा लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतो”

भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणीला लोखंडी रॉडने मारहाण, चंदननगर परिसरातील प्रकार

पुणे : पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून मारहाण करुन महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

दरोड्याच्या तयारीतील टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, कोयते जप्त

Pune Police News | पुणे : महिला पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित

पुणे : पाठलाग करुन महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून बेकायदा फ्लॅट बळकावले; शरद बारणे आणि बाळासाहेब बारणेंच्या विरूध्द गुन्हा दाखल