Pune Crime News | पुणे : 23 वर्षीय तरूणीला भेटण्यासाठी बोलवून घेऊन कारमध्ये बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन तरुणीला भेटण्यासाठी बोलावून घेत तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे (Rape In Car). तसेच तरुणीच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना शिवीगाळ केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) एकाला अटक केली आहे. हा प्रकार जून 2021 ते सप्टेंबर 2023 आणि गुरुवारी (दि. 8) रात्री अकराच्या सुमारास वाघोली (Wagholi) येथे घडला आहे.

याबाबत 23 वर्षीय तरुणीने शनिवारी (दि.10) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन गौरव पांडूरंग बोराटे Gaurav Pandurang Borate (वय-27 रा. बोराटे वस्ती, खराडी, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन,506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्य़ादी यांना फोन करुन भेटण्यासाठी बोलवले. भेटण्यासाठी आली नाही तर मी आताच्या आता मरणार आहे, अशी धमकी देवून भेटण्यासाठी भाग पाडले. तरुणी भेटण्यासाठी आली असता आरोपीने त्याच्या कारमध्ये तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वारंवार तरुणीला भेटण्यासाठी बोलावून घेऊन अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली.

आरोपी वारंवार धमकी देत असल्याने फिर्य़ादी यांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यासोबत बोलणे बंद केले. याचा राग आल्याने आरोपी गुरुवारी रात्री अकरा वाजता पीडित तरुणी राहत असलेल्या सोसायटीत गेला. त्याने तरुणीच्या वडीलांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भदे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी देणार्‍या आरोपीचे ससून हॉस्पीटलमधून पलायन, पुणे पोलिस दलात प्रचंड खळबळ