Shivajirao Adhalrao Patil – Amol Kolhe | शिरूरमध्ये रंगणार अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील सामना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन Shivajirao Adhalrao Patil – Amol Kolhe | आता माझा आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) विद्यमान खासदार अमोल कोल्हेंचा थेट सामना होणार आहे. यावेळी मला विजय मिळेल याविषयी मला पूर्ण खात्री आहे. कोणतीही कसर सोडली जाणार नाही. हा विजय यापूर्वी मिळालेल्या बहुमतापेक्षा जास्त मतांनी मिळेल, असा दावा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. आढळराव आज अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. स्थानिक नेते आणि पदाकारी यांची नाराजी दूर झाल्याचा दावा देखील आढळराव पाटलांनी केला आहे.(Shivajirao Adhalrao Patil – Amol Kolhe)

अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर यासंदर्भातील बैठकीसाठी जाण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना आढळराव पाटील यांनी म्हटले की, मला काल अजित पवार यांनी फोन करून सांगितले की उद्या सकाळी दहा वाजता चार-पाच आमदारांना बोलवत आहे. आपण सगळे बसून चर्चा करु.

पुढचे नियोजन कसे करायचे यावर आपण बोलु. त्यानुसार मी बैठकीसाठी निघालो आहे. काल माझ्याशी एवढेच बोलणे झाले होते. मी माध्यमांमधूनच ऐकत आहे की अजित पवार गटात आज प्रवेश होणार आहे. तसे असेल तरी हरकत नाही, असेही पाटील यांनी म्हटले.

आढळराव पाटील म्हणाले, अजित पवार गटाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता वगैरे माध्यमांमध्ये चालू आहे.
प्रत्येकाशी बोलणे झाले आहे. कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. सर्वकाही गैरसमज दूर झालेले आहेत,
असा दावा आढळराव पाटील यांनी केला.

दरम्यान, आढळराव पाटील हे शिंदे गटात असून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते.
मात्र, जागावाटपात ही जागा अजित पवार गटाकडे गेल्यामुळे आढळराव पाटील यांची अडचण झाली होती.
त्यामुळे ते अजित पवार गटात प्रवेश करून ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Poona Gujarati Bandhu Samaj | श्री पूना गुजराती बंधू समाज ची निवडणूक बिनविरोध ! अध्यक्ष पदी नितीनभाई देसाई व मॅनेजिंग ट्रस्टी पदी राजेश शहा यांची फेरनिवड निवड

PM Modi On Moscow Attack | रशियात दहशतवादी हल्ला; 70 ठार, 115 जखमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध

Sharad Pawar Vs Ajit Pawar | पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच होलसेल चोरी, सगळे सोडून गेले, गेले ते गेले! आपण नवीन उभे करू : शरद पवार