Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर 59 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बिल्डींगच्या लिफ्टमधून शाळेत जात असताना एका अल्पवयीन मुलीसोबत 59 वर्षीय व्यक्तीने अश्लील चाळे करुन विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी नराधमावर पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.4) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित 13 वर्षाच्या मुलीच्या आईने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) शनिवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. यावरून नवीन कुमार सोळंखी Naveen Kumar Solankhi (वय-59 रा. भवानी पेठ) याच्यावर आयपीसी 354, 354(ड), पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 13 वर्षाची मुलगी शाळेत जाण्यासाठी बिल्डींगच्या लिफ्टमधून खाली येत होती. त्यावेळी आरोपी लिफ्टमध्ये आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीला ‘तु किती सुंदर दिसते’ असे म्हणून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तसेच मुलगी शाळेतून घरी येत असताना तिचा पाठलाग केला. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी खडक पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वटे करीत आहेत.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणीसोबत अश्लील वर्तन

पुणे : मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरुन आलेल्या तरुणाने एका तरुणीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिपार चौकातील बस स्टॉप येथे शनिवारी (दि.6) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत 23 वर्षीय पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन 30 वर्षाच्या अनोळखी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निंबाळकर (API Nimbalkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यात ज्येष्ठ नागरिक बनताहेत चोरट्यांचे ‘टार्गेट’, स्वारगेट, कोथरुडमध्ये ज्येष्ठांना लुटले