Pune Lok Sabha Election 2024 | पुणे : ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | देशात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्या निमित्ताने पुण्यातील ब्राह्मण समाजाच्या (Brahmin Samaj) संस्थांसोबत भाजप नेते राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संवाद साधला. यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar), पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वजीत देशपांडे, व्यावसायिक किशोर सरपोतदार इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.(Pune Lok Sabha Election 2024)

ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिलेला आहे व या निवडणुकीत देखील देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांनी एकमुखाने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी प्रामुख्याने शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे विश्राम कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी,अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक चे पुणे केंद्राचे विश्वनाथ भालेराव, ब्राह्मण महासंघाचे चैतन्य जोशी, ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड. ईशानी जोशी, रिपाई ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे अशोक जोशी, प्रमोद जोशी, परशुराम सेवा संघाचे उपेंद्र जपे, ऋषिकेश सुमंत, स्वप्निल कुलकर्णी, धीरज जोशी, शैलेश खोपटीकर, डॉ. संजीवनी पांडे, श्रुती कुलकर्णी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विजय शेकदार, वृषाली शेकदार, केतकी कुलकर्णी, पल्लवी गाडगीळ, आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ब्राह्मण समाज हा नेहमीच देशाच्या प्रगतीत वाटा उचलणारा समाज आहे, ब्राह्मण समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने अमृत नावाची संस्था देखील सुरू केली आहे व वेळोवेळी ब्राह्मण समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार व स्वतः वैयक्तिक पातळीवर देखील आपण प्रयत्न करतच असतो या सर्व संस्था अतिशय उत्तम काम करीत आहेत व त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू.

पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले गेली 25 वर्ष ज्या भागातून मी राजकारण करत आहे तो संपूर्ण भाग ब्राह्मण बहुल असून ब्राह्मण समाजाने नेहमीच मला पुत्रवत प्रेम दिले आहे माझ्यासाठी नेहमीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या या समाजाला मी देखील कोणतीही तक्रारीची संधी देणार नाही देशाची यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट केले पाहिजे.

ह्या बैठकीत विधानसभा निहाय मेळावे घेऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे ठरविण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chandan Nagar Crime | पुणे : उधारीवर सिगारेट न दिल्याने धारधार शस्राने केले वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR

Pune Dhayari Crime | पुणे : जुन्या वादातून टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन सराईत गुन्हेगारांना अटक