Pune Crime News | पुणे : गर्लफ्रेंडच्या कारणावरुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गर्लफ्रेंडच्या कारणावरुन एका तरुणाला दुचाकीवरुन नेऊन त्याच्या डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police) एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे (Criminal On Police Records). हा प्रकार रविवारी (दि.28) रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास रास्तापेठ व मुंढवा येथील कुंभारवाडा चौकातील मैदानावर घडला आहे.(Pune Crime News)

याबाबत अभिषेक शंकर गायकर (वय-30 रा. रेल्वे गेट नं.1, बोपोडी, पुणे) याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोहेल सलीम मुल्ला Sohail Salim Mulla (वय-22 रा. एस.आर.ए. बिल्डींग, विमाननगर, पुणे) याला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारावर आयपीसी 307, 365, 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सोहेल मुल्ला हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर कोंढवा (Kondhwa Police Station), विमानतळ (Viman Nagar Police Station), समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्लफ्रेंडच्या कारणावरून आरोपींनी अभिषेक गायकर याला शिवीगाळ करुन
लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपी सोहेल याने सिमेंटचा ब्लॉक फिर्यादीच्या डोक्यात मारु जीवे मारण्याची धमकी
दिली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून मुंढवा येथील कुंभारवाडा चौकात घेऊन गेले.
त्याठिकाणी अभिषेक याला मोकळ्या मैदानात नेऊन कंबरेच्या बेल्टने मारहाण केली.
जीवे मारण्याच्या उद्देशाने मोठा दगड डोक्यात टाकला. मात्र, त्यांनी दगड चुकवल्याने अभिषेक थोडक्यात बचवला.
तेथून जाताना आरोपींनी पोलिसांकडे तक्रार केली तर मारुन टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Raod Pune Crime | पुणे : सिंहगड रोड परिसरातील बंगल्यात 44 लाखांची घरफोडी

Ajit Pawar On Supriya Sule | अजित पवारांनी नाव न घेता लेकीला मतदान न करण्याचे केले आवाहन, म्हणाले माहेरी आलेल्या लेकीला साडीचोळी करा पण…

Amol Kolhe On Ajit Pawar | शिरुरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही ! डॉ. अमोल कोल्हे यांचं अजित पवारांना सडेतोड उत्तर