Pune Crime News | पुणे शहरात वेगवेगळ्या भागात खुनाच्या प्रयत्नाच्या तीन घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) पुणे शहरातील (Pune City) वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या (Police Station) हद्दीत तीन खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे शहरातील (Pune City) लोणीकंद (Lonikand), खडकी (Khadki), भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. खडकीमध्ये (Khadki) दोन टोळक्यांमध्ये एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन वाद झाले. याच वादातून कोयत्याने वार करण्यात आले. तर कात्रज बस स्थानकाजवळ (Katraj bus stand) पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केला. तर लोणीकंदमध्ये (Lonikand) कंपनीतून काढल्याच्या रागातून दोघांनी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला. pune crime news pune city four attempts to murder in various parts of city

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

कात्रजमध्ये टोळक्याकडून कोयत्याने वार
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharati vidyapeeth police station) हद्दीमध्ये 5 जणांच्या टोळक्याने पुर्वीच्या भांडणातून एकावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी शुभम परदेशी (Shubham Pardeshi) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharati vidyapeeth police station)अटक (Arrest) केली आहे. तर त्याच्या तीन अल्पवयीन साथिदारांना ताब्यात घेतले आहे. तानाजी राजाभाऊ जाधव Tanaji Rajabhau Jadhav (वय-35 रा. आयप्पा मंदिराजवळ, संतोष नगर कात्रज) असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक घावटे (Assistant Police Inspector Ghavte Investigate) तपास करित आहेत.

एकमेकांकडे पाहण्यावरुन खडकीत दोन गटात राडा
खडकीमध्ये (Khadki) दोन गटामध्ये एकमेकांकडे पाहण्यावरुन राडा झाला. ही घटना 30 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खडकी मधील संजय गांधी भाजी मंडई (Sanjay Gandhi Vegetable Market) परिसरात घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki police station) परस्परविरोधी गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आफरीद सलीम शेख Afrid Salim Sheikh (वय-21 रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार 5 जणांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात (Khadki police station) खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सुलतान उर्फ शाहरुख बागवान Sultan alias Shah Rukh Bagwan, इरफान बागवान Irfan Bagwan, मोहसीन बागवान Mohsin Bagwan, अरबाज बागवान Arbaaz Bagwan (सर्व रा. दर्गा वसाहत) या चार जणांना अटक केली आहे. तर सोहेल खान Sohail Khan फरार आहे.

कंपनीतून काढल्याच्या रागातून खूनाचा प्रयत्न
कंपनीत हेल्पर (Helper) म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला व त्याच्या मित्राला कामावरुन कमी करण्यात आले आहे.
याचा राग मनात धरुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची घटना घडली आहे.
ही घटना विठ्ठलवाडी वाघोली (Vithalwadi Wagholi) येथील सिस्का कंपनीमध्ये (Cisco Company) 30 जून रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सुशील बाळू रोकडे (Sushil Balu Rokade) (वय-28 रा. येरवडा) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikanda Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सागर इटकर Sagar Itkar (वय-25 रा. वाघोली) याच्यावर खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
आरोपी इटकर याने सुशिल रोकडे याच्यावर हत्याराने वार केले.
सुशील याच्या खांद्यावर, मानेवर व डोक्यात वार केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी (Sub-Inspector of Police Ramakrishna Dalvi) करित आहेत.

Web Titel : pune crime news pune city four attempts to murder in various parts of city