Pune Crime News | पुण्यातील बुधवार पेठेत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची पुन्हा मोठी कारवाई ! अल्पवयीन मुलीसह 7 बांगलादेशी नागरिकांना पकडले (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून बांगलादेशी (Bangladeshi Nationals In Pune) नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. पुण्यात बेकायदा राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांकडून (Pune Police) कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी 19 बांगलादेशींना ताब्यात घेतले होते. यामध्ये 10 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश होता. यानंतर पुन्हा अशा प्रकराची कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) बुधवार पेठेत (Budhwar Peth) केली आहे. (Pune Crime News)

पुणे पोलिसांनी शहरातील बुधवार पेठ परिसरात कारवाई करुन बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 7 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 5 महिला 2 पुरुषांचा समावेश आहे. तर एका अल्पवयीन मुलीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलीला बांगलादेशातून वेश्या व्यवसाय करण्यासाठी शहरातील बुधवार पेठेत आणण्यात आले होते. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली आहे. (Pune Crime News)

बुधवार पेठेत 10 वर्षात 61 बांगलादेशींना पकडले

भारतात बेकायदा प्रवेश करुन पुण्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. गेल्या 10 वर्षात 61 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी पकडले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात अवैध पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध पारपत्र अधिनियम 1950, तसेच परकीय नागरिक आदेश 1978 अन्वये फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित महिलांना दलालांकडून कामाचे आमिष दाखवून पुण्यात आणल्यानंतर वेश्याव्यवसायात (Prostitute Business) ढकलल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale) आणि
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव
(Sr PI Bhart Jadhav), सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), एपीआय अनिकेत पोटे
(API Aniket Pote), एपीआय राजेश माळगावे (API Rajesh Malegave), पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत,
पोलीस हवालदार बाबा कर्पे, पोलीस हवालदार तुषार भीवरकर, माहिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे,
पोलीस हवालदार अजय राणे, पोलीस नाईक इरफान पठाण, पोलीस नाईक सागर केकाण, पोलीस नाईक अमेय रसाळ, पोलीस नाईक इम्रान नदाफ, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, महिला पोलीस नाईक रेश्मा कंक पोलिस शिपाई संदीप कोळगे, पोलिस शिपाई अमित जामदाडे, पोलिस शिपाई किशोर भुजबळ आणि पोलिस शिपाई ओंकार कुभार यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP on Bhaskar Jadhav | ‘तोंड उघडले की गटारगंगा!’ भास्कर जाधवांच्या टीकेवर भाजपचा पलटवार

Pune Crime News | दाजीचा खून करुन मेव्हण्याची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना