Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : 33 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) रामलिंग (Ramling Shirur) येथील एका 33 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 8) रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या मदतीने गळफास घेवुन आत्महत्या (Suicide In Pune) केली आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये (Shirur Police Station) नोंद करण्यात आली आहे.

अंजली ज्ञानदेव गायकवाड (33, रा. रामलिंग, ता. शिरूर, जि. पुणे) असे गळफास (Galfas) घेऊन आत्महत्या
केलेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद
दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गायकवाड यांना त्यांची मुलगी शलाका सुपेकर
(रा. श्रीगोंदा, अहमदनगर) यांनी कॉल करून अंजली हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले.
त्यानंतर ते सर्वजण शिरूर येथील वेदांता हॉस्पीटल येथे गेले. तेथील डॉक्टरांनी अंजली यांचा उपचारापुर्वीच
मृत्यू झाल्याचे सांगितले. शिरूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-   Pune Crime News | Pune Crime News: 33-year-old woman committed suicide by hanging herself

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pakistan Ex PM Imran Khan Arrested | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्सान पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक (Video)

Maharashtra Politics News | काका मला वाचवा म्हणायची अजित पवारांवर वेळ आली, शिंदे गटाच्या खासदाराची टीका

MP Shrikant Shinde | ‘मला अजून उलगडायला लावू नका…’; श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)