Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – बिल जास्त झाल्याच्या विचारणेवरुन डोक्यात दारुची बाटली फोडली

पुणे : Pune Crime News | दारुचे बिल जास्त झाल्याबाबत विचारणा करण्यावरुन झालेल्या वादात वाईन्स शॉपमधील (Wine Shop) कर्मचाऱ्याने डोक्यात दारुने भरलेली काचेची बाटली मारुन जखमी केले. (Pune Crime News)

याप्रकरणी शफी सलीम खान (वय ३९, रा. प्रायवेट रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये
Koregaon Park Police Station (गु. रजि. नं. ६३/२३) दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी शुभम भिमराव वानखेडे Shubham Bhimrao Wankhede (वय २३, रा. शांतीनगर, येरवडा -Yerwada) याला अटक केली आहे. हा प्रकार ढोले पाटील रोडवरील एफ केज वाईन्स शॉपमध्ये (F Cage Wines Shop, Dhole Patil Road) २४ एप्रिल रोजी रात्री पावणेआठ वाजता घडला.

फिर्यादी व त्यांचा मित्र साजिद पटेल हे एफ केज वाईन्स येथे दारु खरेदी करण्याकरीता गेले होते.
शॉपमध्ये सर्व्हिस देणार्‍या शुभम वानखेडेकडे त्यांनी बिल जास्त का झाले याबाबत विचारणा केली.
तेव्हा त्याने उलट सुलट उत्तरे दिली. त्याचा राग येऊन फिर्यादी याने त्याच्या थोबाडीत मारली.
तेव्हा त्याने फिर्यादीच्या डोक्यात दारुने भरलेली काचेची बाटली मारुन जखमी केले.
पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Koregaon Park Police Station – Liquor bottle smashed on head after asking about overbilling

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : मिळकतकराची बिले 1 मे पासून नव्हे तर ‘या’ तारखेपासून मिळणार, 15 जुलैपर्यंतच मिळणार सवलत

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : बीपी (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह) साठीची 6 प्रकारची औषधे मिळणार मोफत

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

Roll Ball World Cup Tournament In Pune | सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद