Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : मिळकतकराची बिले 1 मे पासून नव्हे तर ‘या’ तारखेपासून मिळणार, 15 जुलैपर्यंतच मिळणार सवलत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax | राज्य सरकारने (Maharashtra State Govt) मिळकतकरात मिळणारी 40 टक्के सूट काम ठेवल्यानंतर पुणे महानगरपालिकेने यापुर्वी 1 मे पासून कराची बिले देण्याचे जाहीर केले होते. पण, आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. ही बिले आता 15 मे पासून ऑनलाइन पध्दतीने पाठवली जाणार असून याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, नागरिकांना बिले उशिरा दिले जाणार असल्याने आता ही सवलत 15 मे ते 15 जुलैपर्यंत देण्याबाबत देखील प्रस्तावात म्हंटले आहे. (Pune PMC Property Tax)

राज्य सरकारकडून पुणेकरांना मिळकतकरावर 40 टक्के सवलत कायम ठेवली. तसेच थकबाकीसह देखभाल दुरूस्तीसाठी देण्यात येणारी 15 टक्के सवलत 10 टक्के केली. त्यामुळे मनपाला आता तब्बल 12.50 लाख मिळकतकराची बिले नवीन तयार करावी लागणार आहेत. प्रथम बिले ही ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यात येतील तर त्यानंतर प्रिंटेट बिले टपालाव्दारे पाठविण्यात येणार आहेत. 20 ते 25 दिवसांचा कालावधी हा बिले तयार करण्यासाठी लागणार आहे. (Pune PMC Property Tax)

पुणे मनपाकडून मिळकतकर वाजवी भाडे मूल्यावर आकारला जातो.
शहराच्या प्रत्येक भागाचे दर हे वेगवेगळे असल्याने सर्वच तपशील मनपास बदलावे लागणार आहेत.
दरम्यान, सन 2019 पासून 40 टक्के कर सवलत रद्द केल्यामुळे सुमारे 1 लाख 67 हजार मिळकती असून 97
हजार मिळकतींना ही सवलत रद्द करून 40 टक्के थकबाकी लावण्यात आली आहे.
त्यामुळे या बिलांमध्ये बदल करणे क्रमप्राप्त आहे. राज्य सरकारकडून सवलतीचा निर्णय हा 31 मार्चअखेर घेतला जाईल असा मनपाचा कयास असल्याने मनपाने आधी 1 मे रोजी बिले देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राज्य सरकारकडून निर्णय उशिरा झाल्याने बिलांचे नियोजन बदलावे लागले आहे. दरम्यान, पुणेकरांना बिले उशिरा दिले जाणार असल्याने आता ही सवलत 15 मे ते 15 जुलैपर्यंत देण्याबाबत देखील प्रस्तावात म्हंटले आहे.

Web Title :-  Pune PMC Property Tax | Pune Municipal Corporation: Property tax bills will be received from 15th May and not from 1st May, discount will be available only till 15th July

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – चाकू दाखवून केला घाबरविण्याचा प्रयत्न; तोच चाकू खुपसून केला खून

Police Suspended | मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसाने उगारली भर रस्त्यात तलवार, परिसरात दहशत माजवणारा पोलीस तडकाफडकी निलंबित

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – घरगुती भांडणातून सूनेसह पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल