Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमान नगर पोलिस स्टेशन – मुली बरोबर बोलू नको सांगितल्याने दुचाक्या दिल्या पेटवून

पुणे : Pune Crime News | मुलीबरोबर बोलायचे नाही, तिला त्रास देऊ नको, असे सांगितल्याने मुलाने ती रहात असलेल्या ठिकाणी पार्किंगमध्ये लावलेली दुचाकीसह तीन दुचाकी पेटवून दिल्या.

याप्रकरणी लोहगावमधील एका युवतीच्या वडिलांनी विमान नगर पोलीस स्टेशनमध्ये (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीराम घाडगे (रा. वाघोली) व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खांदवेनगर येथे सोमवारी मध्यरात्री दीड वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी व आरोपी श्रीराम घाडगे हे एका कॉलेजमध्ये शिकतात.
श्रीराम याने तिला माझ्यासोबर बोलत जा असे म्हणून त्रास देत होता. तिने हे आपल्या वडिलांना सांगितले.
तेव्हा त्यांनी आरोपी श्रीराम याला तिला तुझ्यासोबत बोलायचे नाही. उगाच त्रास देऊ नको, असे सांगितले.
त्याचा राग मनात धरुन त्याने एका साथीदाराला बरोबर घेतले.
मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी यांचे पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीला आग लावली.
त्यात त्यांच्या शेजारी असलेल्या आणखी दोन दुचाकींनाही आग लागून त्यांचे नुकसान झाले. पोलीस हवालदार धेंडे तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Viman Nagar Police Station – Girls were given bikes and set on fire after being told not to talk to them

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Mega City |  महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सह. गृहनिर्माण संस्थेचे काम रखडले, 7000 पोलीस कर्मचारी घराच्या प्रतिक्षेत (Video)

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)

Vaikunth Smashan Bhoomi Pune | वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश