Pune Crime News | पुणे : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने पाच लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वर्क फ्रॉम होम जॉब (Work From Home Job) देण्याच्या बहाण्याने एका 44 वर्षाच्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार पुण्यातील शिवणे परिसरात घडला आहे. आरोपींनी वेगवेगळे टास्क देण्याच्या बहाण्याने या व्यक्तीची 5 लाखांची फसवणूक केली. हा 30 जून 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी भास्कर बळाराम शिंदे (वय-44 रा. देशमुखवाडी, शिवणे, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेलीग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्याविरोधात आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट कलम 66(डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. शिंदे यांनी याबाबत पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी उत्तमनगर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून भास्कर शिंदे यांच्याशी संपर्क साधला.
त्यांना वर्क फ्रॉम होम राहून पैसे कमता येतील असे सांगितले.
आरोपींनी शिंदे यांना बार्टलेबी प्रा. लि. या कंपनीसाठी (Bartleby Pvt. Ltd. Company) जाहिरात करण्यासाठी टास्क देऊन तो पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवले. पहिल्या दोन टास्कचे पैसे फिर्यादी यांच्या बँक खात्य जमा करुन त्यांचा विश्वास संपादन केला. (Pune Crime News)

त्यानंतर शिंदे यांना वेगवेगळी कारणे सांगून 4 लाख 95 हजार 280 रुपये येस बँक, एचडीएफसी बँक,
आयसीआयसीआय बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर शिंदे
यांना कोणताही टास्क न देता सायबर गुन्हेगारांनी पैशांचा अपहार करुन फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Narcotics Control Bureau | पुणे ग्रामीण भागात मुंबई नार्कोटिक्स विभागाचे छापे, अंमली औषध साहित्य जप्त

12 October Rashifal | मिथुन आणि कर्कसह ‘या’ चार राशीवाल्यांसाठी दिवस चांगला, होईल धनलाभ