Mumbai Narcotics Control Bureau | पुणे ग्रामीण भागात मुंबई नार्कोटिक्स विभागाचे छापे, अंमली औषध साहित्य जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Narcotics Control Bureau | पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अंमली पदार्थ सापडत आहेत. मुंबई येथील नार्कोटिक्स विभागाने नुकतीच जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली औषध साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून ही कारवाई अतिशय गोपनीय पद्धतीने केली आहे. (Mumbai Narcotics Control Bureau)

कारवाई दरम्यान मुंबई नार्कोटिक्स विभागाने प्रसारमाध्यमे, स्थानिक नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवले होते. अंमली पदार्थ सापडल्यानंतर या ठिकाणाला सील करण्यात आले आहे. पिंपळगाव गावातून वडगाव सहानी गावाकडे जाणाऱ्या रोडलगत राजन वऱ्हाडी यांचे घर आणि शेती असून घराजवळ पत्र्याचे शेड आहे. यामध्ये ड्रग्स साहित्य तयार करण्यात येत होते. राजन वऱ्हाडी हे यांनी हे शेड जाधव नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. दरम्यान वऱ्हाडी हा फरार असल्याचेही समजते. (Mumbai Narcotics Control Bureau)

मुंबई पोलिसांनी नुकतीच नाशिक येथील एका कारखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात 300 कोटींचा मेफेड्रॉनचा साठा जप्त केला होता. ड्रग्स माफिया ललित पाटील पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पळून गेल्यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिक येथे मोठी कारवाई केली आहे. हा कारखाना ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्या नावावर असल्याचे समजते. या प्रकरणात जुन्नरच्या या कारवाईशी संबंध असल्याची शक्यता स्थानिक बोलून दाखवत आहेत.

दरम्यान, मुंबई नार्कोटिक्सच्या पथकाने जुन्नर तालुक्यात कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती.
सुत्रांच्या माहितीनुसार या कारवाईत 26 किलो अल्प्राझोलम आणि इतर कच्चा माल सापडला आहे.
अल्प्राझोलम हे मानसिक विकारांसाठी वापरले जाते. हे गुंगीकारक असल्याचे तज्ज्ञांकडून समजते.
अल्प्राझोलम मुळे विशेषत: वयस्क लोकांमध्ये, स्मृति संबंधीत समस्या, पेंग, संभ्रम निर्माण होऊ शकतो, शरीराच्या हालचालींवरील नियंत्रण यामुळे सुटण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rajasthan Vidhan Sabha Election Date Changed | राजस्थानमध्ये मतदानाची तारीख बदलली, आता २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान

Pune Crime News | तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या लेखापाल यांना लाच प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर