Pune Crime News | पुणे : शिवीगाळ करुन महिलेला मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महिलेच्या घरासमोर येऊन पतीला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देऊन महिलेची साडी ओढून विनयभंग (Molestation) केल्याची घटना घडली आहे. याप्ररकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) सराईत गुन्हेगारावर गुन्हा (Criminal On Police Records) दाखल केला आहे. हा प्रकार भवानी पेठेत 27 एप्रिल रोजी रात्री सातच्या सुमारास घडला आहे.

याबाबत 24 वर्षीय पीडित महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मंदार उर्फ बाबु निखील सोरटे
Mandar Alias Babu Nikhil Sorte (रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. शनिवारी (दि.27) रात्री सातच्या सुमार फिर्यादी महिला घरात जेवण तयार करत असताना आरोपी घरासमोर आला. त्याने शिवीगाळ करत तुझा नवरा कुठे आहे? त्याला मघाशीच थोडा मारलाय. कोठे लपुन बसलाय त्याचे तुकडेच करतो अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी महिलेच्या कानशिलात लगावून लाथा मारल्या. फिर्यादी महिला जमीनीवर पडली असता आरोपी त्यांची साडी ओढून अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

लग्न समारंभात महिलेचा विनयभंग

पुणे : लग्न समारंभात संगिताचा कार्यक्रम सुरु असताना महिलेसह तिच्या सोबत असलेल्या महिलांचे व्हिडीओ व फोटो काढून विनयभंग केला.
याप्रकरणी विजय श्रीकिसन माने Vijay Shrikisan Mane (वय- 24), यश गोपाळ वारुदे Yash Gopal Warude
(वय-22 रा. मध्यप्रदेश) यांच्यावर आयपीसी 354(अ), 452, 504, 506, 294 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 24 वर्षीय विवाहितेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Swargate Pune Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, स्वारगेट परिसरातील घटना

PM Modi Sabha In Pune | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभास्थळावरील फ्लेक्स तुफान व्हायरल, सुशिक्षित बेरोजगाराची व्यथा, ”युवकांचा आक्रोश तुम्हाला…”