Pune Crime News | पुणे : फ्लॅट न देता 80 लाखांची फसवणूक, भल्ला इस्टेट प्रा. लि. च्या संचालकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फ्लॅट न देता एका ज्येष्ठ नागरिकाची 80 लाखाची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील भल्ला इस्टेट प्रा. लि. कंपनीच्या (Bhalla Estate Pvt. Ltd. Company) डारेक्टर विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2012 पासून आज पर्यंत वानवडी येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत शब्बीर जाफरभाई जरवाला (वय-62 रा. सरस्वती सोसायटी, जांभुळकर चौक, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भल्ला इस्टेट प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर विकास भल्ला (Director Vikas Bhalla) यांच्यावर आयपीसी 406, 420, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भल्ला इस्टेट प्रा. लि. चे डायरेक्टर आरोपी विकास भल्ला यांनी फिर्यादी यांच्यासोबत ओळख करुन विश्वास संपादन केला. 2012 मध्ये विकास भल्ला हे फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी फिर्यादी यांना ऊंड्री येथील जागेवर ते सनश्री नावाचा गृहप्रकल्पाची उभारणी असल्याचे सांगितले. गृहप्रकल्पामध्ये बांधकाम पुर्व ऑफर देऊन फिर्यादी यांनी थ्री बीएचके फ्लॅट 71 लाखांना देण्याचे अश्वासन दिले. (Pune Crime News)

त्यानुसार शब्बीर जरवाला यांच्याकडून वेळोवेळी फ्लॅटसाठी 80 लाख रुपये घेतले.
मात्र, आरोपी विकास भल्ला याने फिर्यादी यांना फ्लॅट तसेच पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.
तसेच फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शब्बीर जरवाला यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला.
तक्रार अर्जाची चौकशी करुन वानवडी पोलिसांनी विकास भल्ला यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, 28 वर्षाच्या तरुणाला अटक; एरंडवणा येथील प्रकार

खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर वार, खडक परिसरातील घटना; तिघांना अटक

दुचाकीचा धक्का लागल्याच्या रागातून ब्लेडने वार, लोहियानगर मधील घटना