Pune Crime News | पुणे-कसबा पेठ क्राईम न्यूज : कुंभारवाडा येथे हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल; 5 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कसबा पेठेतील कुंभारवाडा (Kumbharwada, Kasba Peth) परिसरात एकमेकांच्या शेजारी राहणार्‍यांमध्ये किरकोळ कारणावरून वादीवाद होवुन भांडणे झाली आणि त्यानंतर हाणामारी झाली. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraskhana Police Station) परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी एकुण 5 जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

सागर हेमंत परदेशी (30, रा. 991/92, कुंभारवाडा, कसबा पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पारस मनोज परदेशी, अक्षय मनोज परदेशी, सुरज संतोष परदेशी यांना अटक केली आहे तर पारस मनोज परदेशी (28, रा. 991/92, कुंभारवाडा, कसबा पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर हेमंत परदेशी (30) आणि परशुराम ओंकारसिंग परदेशी (45) यांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सागर परदेशी आणि पारस परदेशी हे एकमेकांचे शेजारी आहेत. सागर आणि त्यांचे मामा परशुराम परदेशी हे पीओपीची पोती गाडीतुन खाली करत होती. त्यावेळी पारस हा रोडच्या मध्ये उभा होता. सागरने त्याला रोडच्या बाजुला उभा रहा असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. शिवीगाळ करून पारस, अक्षय आणि सुरज एकत्र आले. अक्षय परदेशीने हातातील लोखंडी कोयत्याच्या उलटया बाजुने सागर परदेशी यांच्या डोक्यात व खांद्यावर, दंडावर मारहाण केली तसेच सागर यांचे मामास धक्काबुक्की केली.

पारस परदेशीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पारस हा रस्त्यावरून जात असताना सागरने त्याला धक्का दिला.
तसेच समोर बघुन जा असे म्हणाला. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला.
सागर आणि परशुराम परदेशी यांनी पारसला मारहाण केली.
भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाईक महिलेला आरोपींनी ढकलुन देवुन त्यांच्या पायावर लाथा मारून
त्यांना फ्रॅक्चर केले. पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून एकुण पाच जणांना अटक केली आहे.
पोलिस उपनिरीक्षक दाढे अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Pune-Kasaba Peth Crime News : Clash in Kumbharwada, conflicting cases filed; 5 people arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : ग्रीनफिल्ड रेस्टोबारच्या दोघांवर गुंडांकडून हत्याराने सपासप वार, खुनी हल्ला करणारे तिघे ताब्यात

MNS Chief Raj Thackeray | हे प्रशासनाला कळलं नाही का?, श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर 11 जणांचा उष्माघाताने मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र