Pune Crime News | पुणे : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून छातीवर चाकूने वार करून खून (Murder Case Pune) करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश के.पी.नांदेडकर (Judge KP Nandedkar) यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल मंगळवारी (दि.16) जाहीर करण्यात आला. अश्विन विकास गवळी, रिझवान मोहम्मद अन्सारी असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार जून 2018 रोजी घोरपडे पेठेतील शिवाजी रोडवर (Shivaji Road Pune) घडला होता.(Pune Crime News)

याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) आयपीसी 302, 201, 341, 404 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. अश्विन गवळी याला भादवि 302 कलमांतर्गत जन्मठेप व 10 हजार रुपये दंड व न भरल्यास सहा महिने शिक्षा तसेच भादंवि कलम 201 मध्ये दिड वर्षे साधी कैद व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, भादंवि कलम 341 मध्ये रुपये एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 8 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर आरोपी रिझवान अन्सारी याला भादंवि कलम 404 मध्ये दीड वर्षे साधी कैद व रुपये 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद सुनावण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वाडेकर यांनी सरकारची बाजू न्यायालयात मांडली. प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले. तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रमोद धिमधिमे काम पाहिले त्यांना कोर्ट अंमलदार सुहास डोंगरे यांनी कामकाजात मदत केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज