Pune Crime News | पुणे : ऑनलाईन मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीचे ‘ते’ फोटो केले व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फ्रि फायर गेम (Free Fire Game) मार्फत ऑनलाईन मैत्री (Online Friendship) करुन तिला न्यूड फोटो पाठवण्यास भाग पाडले. हे फोटो व्हायरल करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जून 2023 व जुलै 2023 मध्ये बिबवेवाडी येथे पीडित मुलीच्या घरी घडला आहे. याप्रकरणी एकावर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यावरुन अमनकुमार (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354, 354ड, आयटी अॅक्ट 66 ई, पोक्सो कलम 11, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी मागील तीन वर्षापासून फ्रि फायर गेम खेळते. या गेमच्या माध्यामातून आरोपीने मुलीसोबत ऑनलाईन मैत्री केली. आरोपीने जून 2023 व जुलै 2023 मध्ये दुसऱ्या मुलीला जिवे ठार मारतील अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्या मुलीला तिचे न्युड फोटो पाठवण्यास भाग पाडले.
त्यानंतर त्याने रिलेशनमध्ये राहिली नाही तर ते फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची वेळोवेळी धमकी दिली.
तसेच तिला सतत फोन करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिचा विनयभंग केला.
आरोपीने मुलीचे न्युड फोटो तिच्या वडिलांना व आजीला व्हॉट्सअॅप द्वारे पाठवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे स्वप्नाली शिंदे (PI Swapnali Shinde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तिने बिबट्याच्या तोंडावर मारली बॅग, दुचाकीवरील दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला, पती जखमी