Pune Crime News | NIA ने प्रत्येकी 5 लाखांचे बक्षीस लावलेले फरार 2 अतिरेक्यांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने National Security Agency (NIA) प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले राजस्थानमधील (Rajasthan) दोन अतिरेकी (Terrorists) गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात लपवून बसले असल्याचे उघडकीस आले आहे. एका वाहन चोरीच्या (Vehicle Theft Case) प्रकरणात नाकाबंदीच्या दरम्यान दोघांना ताब्यात घेतले असताना ते फरार अतिरेकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Crime News)

 

इम्रान खान (Imran Khan) आणि मो. युनूस साकी (Yunus Saki) अशी या दोन संशयितांची नावे आहेत.

 

याबाबत पोलिस आयुक्त रितेशकुमार (IPS Ritesh Kumar) यांनी माहिती दिली. कोथरुड पोलीस ठाण्याचे (Kothrud Police Station) बीट मार्शल प्रदीप चव्हाण (Beat Marshal Pradeep Chavan) आणि अमोल नझन हे १८ जुलै रोजी गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे पावणे तीन वाजता त्यांनी ३ संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यानंतर त्यांना घरझडतीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिस पथकाने त्यांच्यापैकी दोघांना पकडले. कोंढव्यातील त्यांच्या घरझडतीत पोलिसांनी एक जिवंत काडतुस, ४ मोबाईल आणि लॅपटॉप सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. सुरुवातीला ते वाहन चोर असल्याचा संशय होता. (Pune Crime News)

त्यांच्याकडे सायंकाळी चौकशी केली जात असताना ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांच्याकडील लॅपटॉपची तपासणी केल्यावर ते देत असलेली माहिती आणि त्यातील कागदपत्रे यात विसंगती आढळून आली. त्यामुळे हे दोघेही देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आल्याने शहर पोलिसांनी (Pune Police) ही बाब दहशतवाद विरोधी पथकाला (Anti Terrorism Squad Maharashtra) कळविली. एटीएसचे (ATS Maharashtra) पथकही कोथरुड पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर या दोघांना शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत (Pune Police Crime Branch) आणण्यात आले. स्वत: पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा ते मुळचे मध्यप्रदेशातील असून त्यांनी राजस्थानमधील चितोढगड या ठिकाणी गुन्हा केला होता. त्या ठिकाणी एनआयएने कारवाई केली होती. त्यात काही स्फोटके सापडली होती. त्या गुन्ह्यात हे दोघे संशयित होते. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींनी त्यांना फरार घोषित केले आहे. त्यांना पकडणार्‍यास प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असल्याची माहिती समोर आली.

 

राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ते पुण्यात राहत आहेत.
त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

 

अटक करण्यात आलेले दोघे मध्यप्रदेशमधील रतलामचे असून त्यांनी राजसथानमध्ये गुन्हा केला होता.

 

Web Title :  Pune Crime News | Pune Police arrests 2 fugitive terrorists who
have been given a reward of Rs 5 lakh each by NIA

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा