Pune Crime News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाकडून येरवडा-कल्याणीनगर परिसरातील एलिफंट अ‍ॅन्ड को. रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बारवर कारवाई

रात्री 10 नंतर मोठया आवाजात डांग डिंग, 4 लाखाचे साऊंड सिस्टीम जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रात्री 10 नंतर साऊंड सिस्टीम लावुन मोठया आवाजात संगीत वाजविणार्‍या रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बारवर पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) कारवाई केली आहे. पोलिसांनी 4 लाख रूपये किंमतीची साऊंड सिस्टीम देखील जप्त केली आहे. (Pune Crime News )

 

याबाबत अधिक माहिती अशी की, येरवडा (Yerwada) परिसरातील काही रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बारमध्ये रात्री 10 नंतर मोठया आवाजात साऊंड सिस्टीम सुरू असते. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी कल्याणीनगर परिसरातील निलांजली सोसायटीतील गौरीशंकर कल्याणी बंगोल सो. ले नं. 2, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यु येथील एलिफंट अ‍ॅन्ड को. रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बारवर (Elephant and Co. Kalyani Nagar) छापा टाकला. तेथे मोठया आवाजात डीजे सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करून तेथील 4 लाख रूपये किंमतीचे साऊंड सिस्टीम जप्त केले आहे. (Pune Crime News)

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Sr PI Bhart Jadhav), सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलिस अंमलदार अजय राणे, हनमंत कांबळे, अमेय रसाळ आणि अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Pune Police Crime Branch SS Cell Seizes Sound System Worth Rs 4 Lakh from
Elephant and Co. Kalyani Nagar for playing loud music

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा