Pune Crime News | पुणे : ब्रीगेडियरच्या घरात चोरी करताना चोरट्याला रंगेहाथ पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लष्कराचे दक्षिण मुख्यालय असणाऱ्या परिसरात राहणाऱ्या ब्रिगेडियर व्हीपीएस मलिक (Brigadier VPS Malik) यांच्या बंगल्यात चोरी करुन पळून जाताना एका चोरट्याला पकडण्यात आले. यानंतर चोरट्याला बंडगार्डन पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात देण्यात आले. मुश्ताक बाबुगुलाम शेख (वय-29 रा. मालवण स्टँड जवळ, मालवण, जि. सिंधुदुर्ग) असे पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. (Pune Crime News)

याबाबत लिंबाजी आत्माराम वाकोडे (वय-31 रा. परेड ग्राऊंड, कॅम्प पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात
(Bundagarden Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुश्ताक शेख याच्यावर आयपीसी 380, 454 नुसार
गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ब्रिगेडियर
यांच्या घरी काम करतात. मंगळवारी (दि.28) दुपारी पावणे तीन च्या सुमारास आरोपी उघड्या दरवाजातून ब्रिगेडियर
यांच्या घरात शिरला. त्यानंतर ड्रॉव्हरमधील 550 रुपये व एक लॉकरची चावी घेऊन जाताना फिर्यादी यांनी त्याला पकडले. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वॉईन शॉप मध्ये चोरी

लॉ कॉलेज रोडवरील (Law College Road) दिपक वाईन्स दुकानातून दोन चोरट्यांनी रोख रक्कम व मोबाईल असा
एकूण 2 लाख 27 हजार 435 रुपयांचा मुद्देमाल चोरुन (Stolen) नेला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
याबाबत दिपक अशोक खैरे (वय-46 रा. लॉ कॉलेज रोड, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station)
फिर्य़ाद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास उघडकीस आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर थेट टिका, म्हणाले – ”नालायकांनो आपला पक्ष सांभाळा, आता त्याच पद्धतीनं उत्तर देऊ”

Amit Shah On CAA | CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अमित शाह यांच्या वक्तव्याने मोठ्या वादाची शक्यता