Pune Crime News | पुणे : स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने मारहाण, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ऑफिसमध्ये लावलेल्या स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने चार जणांनी दगडाने मारहाण केली (Marhan). तसेच तक्रारदार यांच्या शॉपमधील दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन तोडफोड केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 21) रात्री पावणे सात वाजण्याच्या सुमारास आंबेडकर नगर येथील आर.के. कॉलनीजवळ घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.(Pune Crime News)

याबाबत महंमद शकील खान (वय-45 रा. आर.के. कॉलनी, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नितीन दत्तु तडेकर व ज्ञानेश्वर म्हस्के (वय-21 दोघे रा. आंबेडकर नगर) यांना अटक केली आहे. तर ओंकार पवार, बाबा मिसाळ व त्याच्या इतर दोन अनोळखी मुलांवर आयपीसी 143, 145, 147, 148, 149, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी त्यांच्या शॉपमधून घराकडे जात होते.
त्यावेळी त्यांच्या घराच्या बाहेरील बाजूस आरोपी नितीन तडेकर याने त्याच्या कार्य़ालयात लावलेल्या स्पीकरचा आवाज
कमी करण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून त्यांच्या अंगावर दगड फेकून मारले.
त्यामुळे फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी फिर्य़ादी यांच्या शॉपवर जाऊन दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच फिर्य़ादी यांच्या शॉपमधील काच फोडून व दरवाजाचे नुकासन करुन पळून गेले.
हा प्रकार समजात फर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik City Police | नाशिक : गोवंश मासाची वाहतुक विक्री करणाऱ्या 8 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई (Video)

Shivsena UBT On Modi Govt | …तर केजरीवाल अजित पवारांसारखे भाजपाचे नवे शंकराचार्य झाले असते, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

Pune Crime News | पुणे : भांडण सोडवणं बेतलं जीवावर, मारहाणीत 57 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू