Pune Crime News | पुणे : भररस्त्यात मिठी मारुन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कामावरुन घरी जाणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मिठी मारुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.14) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास गाडीतळ रोडवरील तुपे हॉस्पिटल समोर घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत महादेवनगर, हडपसर येथे राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.15) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शंकर शिवाजी पोळ (वय-30 रा. उदगिर, जि. लातूर) याच्यावर आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कामावरुन तुपे हॉस्पिटल समोरुन घरी जात होती. त्यावेळी आरोपी पाठीमागून आला. त्याने तरुणीला अचानक मागून मिठी मारुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुलाणी करीत आहेत.

ऑफिस मधील महिलेसोबत गैरवर्तन

येरवडा : ऑफिसमध्ये काम करत असताना महिलेसोबत गैरवर्तन केले. तसेच पार्टीमध्ये महिलेला अश्लील स्पर्श करुन विनयभंग केला. हा प्रकार एप्रिल 2023 ते 9 सप्टेंबर 2023 दरम्यान येरवडा येथील कंपनीत व शास्त्रीनगर येथील हिलीयम पब, इशान्य मॉल येथे घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.15) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन उमेश विलास सुतार (वय-42 रा. कॅम्प, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी हे येरवडा येथील एकाच कंपनीत कामाला आहेत.
फिर्यादी कंपनीत काम करत असताना आरोपीने वेळोवेळी महिलेसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने महिलेला दिसण्यावरुन व कपडे घालण्यावरुन कमेंट केली.
तसेच शास्त्रीनगर येथील हिलीमय पब, इशान्य मॉल येथे पार्टीमध्ये फिर्यादी यांना अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास
लज्जा उत्पन्न निर्माण होईल असे कृत्य करुन एकांतवासाचा भंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे आशालता खापरे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Alandi Accident News | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणीचा जागीच मृत्यू; आळंदी परिसरातील घटना

पिंपरी : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून कोयत्याने तोडफोड

ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी

Pune Koregaon Park Crime | कोरेगाव पार्क येथील फ्लॅटमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका