Pune Crime News | क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास सांगून पुण्यातील तरुणाची 31 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अभासी चलन (क्रिप्टोकरन्सी – Cryptocurrency) व्यवहारात अनेकांची फसवणूक (Cheating Fraud Case) होण्याच्या घटना घडत आहेत. क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक (Investment) केल्यास जास्तीचा फायदा मिळेल असे सांगून सायबर गुन्हेगारांकडून फसणवूक केली जाते. अशीच एक घटना लोणी काळभोर येथे घडली आहे. सायबर गुन्हेगारांनी एका व्यक्तीला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून 31 लाखांचा गंडा घडला आहे. हा प्रकार जुलै 2023 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान ऑनलाईन घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत रवी रघुविर देव (वय-37 रा. लोणीकाळभोर) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 60194123158 नंबरचा धारक व d8932, GCE Gold Trading Group टेलिग्राम धारक तसेच अज्ञात व्यक्ती विरोधात आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, टेलिग्राम ग्रुपमध्ये असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या Erin8 नाव सांगणाऱ्या महिलेने तसेच टेलीग्राम ग्रुप कंपनीत अ‍ॅनॅलीस्ट म्हणून काम करत असल्याचे सांगणारा रिकी नावाच्या व्यक्तीने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी फिर्यादी यांना जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भारतीय कंपनी तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. क्रिप्टोकन्सीमध्ये पैसे गुंतववल्यास त्यांना खूप नफा होईल असे आमिष दाखवून वेगोवेळी वेगवेगळी कारणे सांगून पैसे गुंतवण्यास सांगितले. (Pune Crime News)

फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगण्यानुसार 30 लाख 87 हजार 071 रुपये किंमतीचे क्रिप्टोकरंन्सी ऑनलाईन खरेदी केले.
खरेदी केलेले क्रिप्टोकरन्सी तुमच्या वॉलेट अ‍ॅड्रेसवर पाठवण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले.
फिर्य़ादी यांनी वॉलेट तापसले असता आरोपींनी क्रिप्टोकरन्सी न पाठवता तसेच कोणत्याही प्रकारचा परतावा न
देता फसवणूक केल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
फिर्यादी यांच्या तक्रारी अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Narcotics Control Bureau | पुणे ग्रामीण भागात मुंबई नार्कोटिक्स विभागाचे छापे, अंमली औषध साहित्य जप्त

12 October Rashifal | मिथुन आणि कर्कसह ‘या’ चार राशीवाल्यांसाठी दिवस चांगला, होईल धनलाभ