Pune Crime News | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची तिसरी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) केलेली ही तिसरी कारवाई आहे. पुण्यातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शरिराविरुद्ध (Offenses Against Body) व मालमत्तेविरुद्ध गुन्हे (Property) करणाऱ्या तसेच दहशत माजवून संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

सागर भुजंग नायडू (वय-27 रा. सदाआनंद नगर, मंगळवार पेठ, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, पालघन, लोखंडी रॉड, लाकडे दांडके, बॅट या सारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती. (Pune Crime News)

आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे (Senior Police Inspector Ramesh Sathe) यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला
एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध
करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (P.C.B. Crime Branch Senior Police Inspector Surekha Waghmare) यांनी केली.

Web Title :- Pune Crime News | Pune’s criminal lodged in Nashik Jail, CP Retesh Kumaarr’s third action under MPDA Act

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai ACB Trap | 15 लाख रुपये लाच घेताना वस्त्रउद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar On Pune Police | पुणे पोलिसांच्या ‘त्या’ निर्णयावर अजित पवारांची टीका; म्हणाले – ‘
…तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नयेत’ (VIDEO)

Chinchwad Bypoll Elections | अजित पवारांनी मुलाखत घेण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याने विकत घेतले नामिर्देश पत्र, राजकीय चर्चांना उधाण