Chinchwad Bypoll Elections | अजित पवारांनी मुलाखत घेण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याने विकत घेतले नामिर्देश पत्र, राजकीय चर्चांना उधाण

परी : पोलीसनामा ऑनलाइन – Chinchwad Bypoll Elections | राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच नाना काटे (Nana Kate) यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतले आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अद्याप चिंचवड विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याआधीच राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी अर्ज विकत घेतला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत नाना काटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. (Chinchwad Bypoll Elections)

चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे निधन झाल्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Elections) जाहीर झाली आहे. चिंचवडसह कसबा पोटनिवडणूक (Kasba by-Elections) जाहीर झाली आहे. भाजपने (BJP) दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक (Pune By Election) बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. मात्र, महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दोन्ही ठिकाणची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला होता.
शरद पवार (Sharad Pawar), जयंत पाटील (Jayant Patil)
आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडण्यात आला होता.
चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू होती.
त्यात नाना काटे यांचंदेखील नाव होतं. परंतु राष्ट्रवादीकडून पोटनिवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करण्याआधीच नाना काटे अर्ज विकत घेतला आहे.

 

Web Title :- Chinchwad Bypoll Elections | NCP leader nana-kate-buy-nomination-form-for-ncp-in-chinchwad-assembly-constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | बलात्काराची तक्रार दिल्याने तरुणाचा अल्पवयीन युवतीच्या घरासमोर धिंगाणा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime News | साध्या कणकणीवर डॉक्टरांकडून उपचार करुन घेणे बेतले जीवावर; दोघा डॉक्टरांसह परिचारिकांवर गुन्हा दाखल

 

Narayan Rane | नारायण राणे आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची, म्हणाले-‘तुम्ही पत्रकार नसून शिवसेनेचे प्रवक्ते’

Budget 2023 | केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका; म्हणाले

Kunal Shailesh Tilak | कसबा पोटनिवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून कुणाल टिळकांच्या फसवणुकीचा प्रयत्न