Pune Crime News | अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, बाणेर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घरात कोणी नसताना अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार (Minor Girl Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील बाणेर परिसरात उघडकीस आला आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Pune Police) 16 वर्षीय पीडीत मुलीने तक्रार दिली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मगील दोन वर्षात वारंवार घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत 16 वर्षाच्या पीडित मुलीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) बुधवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. त्यानुसार 32 वर्षाच्या दाजीवर आयपीसी 376, 376/2/एन, 354ड, 506, 506/2, 323, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीचा दाजी असून ते बाणेर परिसरात एकत्र राहतात.
आरोपीने घरी कोणी नसताना पीडित मुलीसोबत जबरदस्तीने चार वेळा लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले.
तसेच याबाबत कोणाला सांगितले तर आईला मारुन टाकण्याची धमकी दिली.
एवढेच नाहीतर आरोपीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल
करण्याची धमकी दिली. तर मागील सहा महिन्यापासून पीडित मुलगी बाहेर जात असताना आरोपीने वारंवार तिचा
पाठलाग करुन तिला हाताने मारहाण (Beating) केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | विमाननगर परिसरात दहशत माजवणाऱ्या करण हतागळे व त्याच्या एका साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 72 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

NCP MLA Amol Mitkari On Ravana Dahan | अमोल मिटकरींचा रावण दहन प्रथेवर आक्षेप; हिवाळी अधिवेशनात करणार ‘ही’ मोठी मागणी