Pune Crime News | बिअरमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार; दुसर्‍याने लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

पुणे : Pune Crime News | बिअरमधून गुंगीचे औषध देऊन त्याने २० वर्षाच्या तरुणीवर बलात्कार (Rape in Pune) केला. तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. इतकेच नाही तर आपल्या मित्राबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी लोहगावमधील एका २० वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८९/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मयुर दत्तात्रय सातव (वय २१, रा. आव्हाळवाडी, वाघोली) याला अटक (Arrest) केली आहे. तर शशिकांत कदम (रा. शुभम सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च ते जुलै २०२२ मध्ये घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शशिकांत कदम हे ओळखीचे आहेत.
कदम याने फिर्यादी यांना बिअरमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध केले.
त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढले. हे फोटो फिर्यादीला दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मयुर सातव याच्याशी संबंध ठेवण्यास भाग पाडले.
त्यानंतर सातव याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.
तिला वारंवार फोन करुन तिचा पाठलाग करुन त्रास दिला.
या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Rape of young woman by giving gungy drug from beer; Another committed torture by luring marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धनकवडीत स्पेशल 26 च्या स्टाईलने घातली ‘धाड’; खोटा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून अ‍ॅन्टी करप्शनच्या नावाने आणि न्यूज रिपोर्टर असल्याचे सांगून लुबाडले

Chhatrapati Sambhajinagar | नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगर ‘या’ कारणाने देशात आघाडीवर

Pune ACB Trap | जलसंपदा विभागाचा उपविभागीय अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; ७ लाखांची लाच मागून साडेतीन लाख घेताना…