Pune Crime News | रिक्षाचे जादा भाडे देण्यास नकार दिल्याने महिलेची रोकड, दागिने असलेली पर्स नेली पळवून; कोंढव्यातील प्रकार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Pune Crime News | कोंढव्या (Kondhwa) तील शिवशंभोनगर (Shivshambho Nagar) ते कात्रज -कोंढवा रोड (Katraj-Kondhwa Road) वरील गोकुळनगर (Gokulnagar) या सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतर असलेल्या प्रवासासाठी साधारण ५० रुपये रिक्षा भाडे होते, याच अंतरासाठी रिक्षाचालका (Rickshaw Driver) ने एका महिलेकडे तब्बल २०० रुपये भाडे मागितले तिने भाडे देण्यास नकार दिल्यावर तिच्याकडील रोकड, दागिने (Jewelry) असलेली पर्स (Purse) जबरदस्तीने चोरुन नेली ही घटना गोकुळनगर येथे २१ जून रोजी सायंकाळी पावणेचार वाजता घडली. Pune Crime News | Refusing to pay extra fare for the rickshaw, the woman’s cash, jewelery purse Nellie snatched; Types of Kondhwa

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसां (Kondhwa Police) कडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या आपल्या १० वर्षाच्या मुलीसह राहतात त्या आईकडे रिक्षाने जात होत्या गोकुळनगर येथील डॉमिनोज पिझ्झाजवळ रिक्षा आली असता त्यांनी चालकाला थांबायला सांगितले. भाडे किती असे विचारले असता त्याने २०० रुपये सांगितले. त्यावर फिर्यादीने भाडे जास्त होतेय. मी दरवेळी ५० रुपये भाडे देते असे सांगितले.

त्यावर रिक्षाचालकाने त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने ओढून घेतली.
त्यात पर्सचा हँगरच फिर्यादीच्या हातात राहिला. पर्स घेऊन रिक्षाचालक पळून गेला.
पर्समध्ये १२ हजार ५०० रुपये, १५ हजार रुपयांचे कानातील लहान मुलाची सोन्याची रिंग जोड,
एटीएम कार्ड, पॅन कार्ड, बँकचे चेक बुक असा २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.

याप्रकारामुळे फिर्यादी घाबरुन घरी गेल्या. त्यांना रक्तदाबाचा त्रास झाला. काही वेळाने त्या पुन्हा त्या जागी आल्या असता रिक्षाचालक रिक्षा घेऊन पळून गेला होता.
रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिली.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी घटनास्थळी भेट दिली.
गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून रिक्षा ज्या मार्गाने आली, त्या ठिकाणचे फुटेज तपासण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते अधिक तपास करीत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Pune Crime News | Refusing to pay extra fare for the rickshaw, the woman’s cash, jewelery purse Nellie snatched; Types of Kondhwa