Pune Crime News | भोसरी पोलिसांकडून जबरी चोरी करणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | फुकट कॅटबरीची मागणी केल्यानंतर ती देण्यास बेकरी मालकाने नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून बेकरीच्या काऊंटरची काच फोडून गल्ल्यातील 3 हजार रूपये जबरदस्तीने (Robbery In Pune) चोरून नेणार्‍यास भोसरी पोलिसांनी (Bhosari Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)

अब्दुल बबलु शेख उर्फ शाहरूख Abdul Bablu Shaikh Alias Shahrukh (रा. वत्सलाबाई काटे चाळ, दापोडी, भासेरी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात नरेश गुलाबराव सबनानी (44, रा. नळेनगर, काळेवाडी, पुणे) यांनी भोसरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 25 मे 2023 रोजी फिर्यादी व त्यांचा कामगार हे बेकरीमध्ये असताना आरोपीने त्यांच्याकडे फुकट बेकरीची मागणी केली.

आरोपीच्या मागणीला फिर्यादींनी नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
त्यानंतर त्याने बेकरीच्या काऊंटरची काच फोडून नुकसान केले आणि गल्ल्यातील 3 हजार रूपये जबरदस्तीने
चोरून नेले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भास्कर करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Robbery In Pune Bhosari police arrested the thief

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत’, भाजप आमदाराची जहरी टीका (व्हिडिओ)

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Maharashtra Politics News | बच्चू कडूंच्या दाव्यामुळं भाजप, शिवसेना अडचणीत, राणांचं टेन्शन वाढलं

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप