Pune Crime News | रोड रोमिओच्या त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रोड रोमिओ (Road Romeo) तरुणाच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempted Suicide) केल्याच्या धक्कादायक घटना ओैध भागात घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी (Pune Police) एका तरुणाला अटक केली आहे.

सागर कांबळे (वय २८, रा. डी. पी. रस्ता, ओैंध) असे त्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६९/२३) दिली आहे. तक्रारदार शाळकरी मुलीचा आरोपी कांबळे गेल्या काही महिन्यांपासून पाठलाग करत होता. त्याने शाळकरी मुलीची छायाचित्रे इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर प्रसारित केली. छायाचित्रावर ‘माझी बायको’ असा संदेश प्रसारित केला होता. आरोपीच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आईने हे पाहून मुलीला वाचविले. कुटुंबीयांनी तिला धीर दिला. तेव्हा आरोपीच्या त्रासामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक रिकिबे (PSI Rikibe) तपास करत आहेत. (Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police | महाराष्ट्रातील 76 पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर ! 3 पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

Pune Crime News | मुलगी, मुले मारण्यास पाठवत असल्याच्या संशयावरुन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातील प्रकार; मामा-भाच्यावर FIR (Video)

Pune Police MPDA Action | पुणे शहरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 40 वी एमपीडीएची कारवाई