Pune Crime News | पुणे-सोलापूर रोडसह लोणीकाळभोर, कुंजीरवाडी, म्हातोबा आळंदी व नायगाव फाटा परिसरात दहशत निर्माण करणारा गुंड तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे-सोलापूर रोडसह (Pune Solapur Road) लोणीकाळभोर, कुंजीरवाडी (Kunjirwadi) , म्हातोबा आळंदी (Mhatobachi Alandi) व नायगाव फाटा (Naigaon Phata Pune) परिसरात गुंड साथीदारांसह वारंवार गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणार्‍यावर पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांनी तडीपारीची (Tadipar Action) कारवाई केली आहे. (Pune Crime News)

 

शुभम संजय धुमाळ Shubham Sanjay Dhumal (22, रा. धुमाळ मळा, म्हस्कोबा मंदिर, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आयुक्तालयाच्या (Pune Police) हद्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कोठार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Crime News)

 

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) शुभम संजय धुमाळ हा पुणे-सोलापूर रोड, लोणीकाळभोर, कुंजीरवाडी, म्हातोबा आळंदी आणि नायगाव फाटा परिसरात वारंवार गुन्हे करीत होता. त्याची सर्वसामान्य जनतेला भिती वाटत होती. त्यामुळे नागरिक त्याच्याविरूध्द तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी त्याला तडीपार करण्याबाबतच प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे पाठविला होता. प्रस्तावाचे अवलोकन करून शुभम संजय धुमाळला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हयातून 2 वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.

 

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एल. चव्हाण (Sr PI DL Chavan),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे (PI Subhas Kale), पोलिस उपनिरीक्षक गोरे (PSI Gore), पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे (PSI Kiran Dhaygude) , पोलिस अंमलदार गणेश सातपुते, संदिप धनवटे आणि तेज भोसले यांनी केली आहे.

 

 

Web Title : Pune Crime News | Shubham Dhumal Who terror Pune-Solapur Road along with
Lonikalbhor, Kunjirwadi, Mhatoba Alandi and Naigaon Fata areas is tadipar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा