Pune District Ration Shops | पुणे ग्रामीण मध्ये 241 गावांत स्वस्त धान्य दुकान परवाने देण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune District Ration Shops | पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २४१ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर (Dr Seema Holkar) यांनी केले आहे. (Pune District Ration Shops)

बारामती आणि दौंड तालुक्यातील प्रत्येकी ३, मावळ – ३६, खेड- १०, आंबेगाव – १९, इंदापूर – ६, वेल्हे- ७०, जुन्नर -१६, पुरंदर- १८, हवेली – २२, भोर आणि शिरुर प्रत्येकी ९ आणि मुळशी तालुक्यातील २० अशा जिल्ह्यातील एकूण २४१ गावांत रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे. (Pune District Ration Shops)

रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात गावांची नावे, सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधित तहसिल कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.

तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी कळविले आहे.

Web Title : Pune District Ration Shops | Ration shop licenses will be given in 241 villages in Pune Rural

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून सराफी दुकान लुटण्याच्या तयारीतील तिघांना अटक, हत्यारे जप्त

NCP Chief Sharad Pawar | पक्ष फोडणाऱ्यांना किंमत मोजावी लागणार ! खा. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे निलंबित करत शरद पवारांचा इशारा

Bank fraud case: CBI registers FIR against Pune-based builder