Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – वाईन शॉपचालकाला लुटण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार; नागरिक जमा झाल्याने चोरटे पळाले (Video)

पुणे : Pune Crime News | दुकानात जमा झालेली कॅश घेऊन घरी जात असताना पिस्तुलाचा (Pistol) धाक दाखवून हातातील पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी प्रतिकार केला. कामगार व नागरिक जमा होत असल्याचे पाहून चोरट्याने हवेत गोळीबार (Firing In Pune) करुन पलायन केले. ही घटना नर्‍हे येथील हिरो वाईन्स शॉपसमोर (Hero Wines Shop, Narhe) रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय ५७, रा. शिवणे) यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम इंगळे यांचे नर्‍हे परिसरात हिरो वाईन्स शॉप आहे. त्यांनी दुकानात दिवसभरात जमलेली २ लाख १९ हजार रुपयांची रक्कम गोळा करुन बॅगेत ठेवली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले व ते गाडीत बसत होते. त्याचवेळी धायरी फाट्याच्या दिशेने मोटरसायकलवरुन दोघे जण आले. पाठीमागे बसलेल्या पांढरा शर्ट घातलेल्या तरुणाने दुचाकीवरुन उतरुन इंगळे यांच्या जवळ येऊन त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यांच्या हातातील बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. परंतु इंगळे यांनी त्याला प्रतिकार करीत बॅग घट्ट धरुन ठेवली. त्यांच्यात झटापट सुरु झाल्याचे पाहून दुकानातील कामगार व नागरिक जमा होऊ लागले. हे पाहून चोरट्याने हातातील पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. त्यानंतर ते महाराष्ट्र बँकेच्या दिशेने पळून गेले. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. सिंहगड रोड पोलिसांनी दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | Sinhagad Road Police Station – Wine shopkeeper shot in air with intent to rob; Thieves fled as citizens gathered (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | नाशिक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍याविरूध्द लाच प्रकरणी गुन्हा

Ajit Pawar | तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार-आमदारांना अपात्र करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

Pune News | पुणे : कृषि विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची’ अभियान राबविण्यात येणार