बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – विलासराव देशमुख मुख्यमंत्री (CM Vilasrao Deshmukh) असताना आम्ही घाबरत घाबरत तिसरे अपत्य (Third Child) झाल्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास अशांना अपात्र केले. सहकार क्षेत्रामध्ये देखील अशा लोकांना अपात्र (Disqualify) केले. त्यावेळी लोक आम्हाला म्हणायचे खासदार (MP) आमदारांना (MLA) हा नियम नाही का. मात्र हा अधिकार आमच्या हातात नसून तो केंद्राच्या (Central Government) हातात आहे. केंद्राने याबाबतचा निर्णय घ्याव अशी मागणी आमची असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. बारामतीत एका खासगी कार्यक्रमादरम्यान रविवारी अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.
अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, आज देशाची लोकसंख्या (Population) 142 कोटींच्या पुढे गेली आहे. याला आपणच जबाबदार आहोत. ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने गेतली पाहिजे. कोणत्याही जातीने धर्माने पंथाने ही देवाची कृपा आहे असं समजू नये. ही कशाची देवाची कृपा? असा उपरोधक सवाल त्यांनी केला. एक किंवा दोन अपत्यावर आपण थांबले पाहिजे. त्याशिवाय आपल्या देशाची, राज्याचे भले होणार नाही. इथून पुढे दोन पेक्षा जास्त अपत्य जन्माला घालणाऱ्यांना कसलीच सवलत दिल्या गेल्या नाहीत तर कुठेतरी जनता जागृत होईल, असेही अजित पवार म्हणाले.
ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं असते ते बरोबर दोन अपत्यांवर थांबतात. तिसऱ्या अपत्याबाबत निर्णय घेताना आम्ही मार्ग काढला.
पहिल्या बाळंतपणात एक अपत्य झाले आणि दुसऱ्यावेळी जुळे (Twins) जन्माला आले, तरी यामध्ये आई-वडिलांचा दोष नाही.
हा विषय मी कॅबिनेट मीटिंगमध्ये (Cabinet Meeting) मांडला होता. दुसऱ्या वेळेस जुळे, तिळे झाले तर तिथेच थांबायचे.
तसेच पहिल्या बाळंतपणा (Childbirth) वेळेस जर जुळे आणि तिळे झाले तर मात्र दुसरे बाळंतपण होऊ द्यायचं नाही.
पहिल्या बाळंतपणा वेळेसच थांबायचं, असं अजित पवारांनी सांगितलं.
Web Title :- Ajit Pawar | disqualify mps and mlas who have a third child ajit pawars demand to the centre
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ambadas Danve | ‘सभेला कुणी आडवं आलं तर…’, पाचोऱ्यातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा शिंदे गटला इशारा