Pune Crime News | ‘आमच्याकडून जागा घ्या अन् आम्हालाच भाड्याने द्या’, जागेच्या किमतीच्या 10 टक्के प्रमाणे भाडे देण्याचे आमिष दाखवून कोटीची फसवणूक

शिवाजीनगर येथील आयडियल इरा येथील प्रकार, डॉक्टरसह 5 जणांवर MPID

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नागरिकांची अनेक प्रकारे फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचे प्रकार समोर येत आहे. वेगवेगळी आमिष दाखून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. पुण्यातील वाकडेवाडी येथील आयडियल इरा कंपनीने (Ideal Era Pvt Ltd) आमच्याकडून जागा घेऊन आम्हालाच भाड्याने देऊन जागेच्या किमतीच्या दहा टक्के भाडे देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची एक कोटी 12 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर खडकी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी मोहन देठे (Mohan Dethe), डॉ. पराग पवार (Dr. Parag Pawar), गणेश गुंड (Ganesh Gund), महादेव ढोपे (Mahadev Dhope), रविंद्र वाडकर (Ravindra Wadkar) व इतरांवर आयपीसी 406, 420 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम 3, 4 व 5 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत दीपक कुशाभाऊ देगांवकर Deepak Kushabhau Degaonkar (वय-48 रा. बालाजी नगर, धनकवडी, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्य़ाद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत आयडियल इरा कंपनीच्या वाकडेवाडी येथील कार्यालयात घडला आहे. (Pune Crime News)

Pune Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी व इतर गुंतवणूकदार (Investors) यांना
कंपनीच्या वेगवेगळ्या स्कीम सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तुम्ही आमच्याकडून जागा घेऊन शकता,
या जागेचे तुमच्या नावाने खरेदीखत झाल्यानंतर ती जागा पुन्हा आम्ही तुमच्याकडून 15 महिन्यासाठी
भाडेतत्त्वावर (Lease) घेऊ, त्या मोबदल्यात तुम्हाला जागेच्या किमतीच्या 10 टक्के प्रमाणे भाडे देऊ असे आमिष दाखवले. तसेच जागा भाडेतत्त्वावर घेण्यापूर्वी कायदेशीर पद्धतीने एग्रीमेंट (Agreement) करुन 15 महिने झाल्यानंतर ही जगा पुन्हा तुमच्या ताब्यात देण्यात येईल. जर तुम्हाला त्या जागेचे पुन्हा एग्रीमेंट आमच्यासोबत करायचे असेल तर तेही आपण करु शकता असे फिर्यादी यांना सांगितले.

आरोपींनी फिर्य़ादी यांच्याकडून चेक व रोख स्वरुपात 1 कोटी 12 लाख 60 हजार 026 रुपये घेतले.
मात्र, त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी खडकी पोलीस ठाण्यात
तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील (PI Man Singh Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुतण्याकडून पाऊण कोटींची फसवणूक, पुण्यातील प्रकार

पुण्यातील वाकडा पुल येथील खुनाच्या प्रयत्नातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता

Sanjay Raut | इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, ‘हे’ नेते नाराज, संजय राऊतांनी दिली माहिती