Pune Crime News | हिंजवडी येथील दुहेरी खुन प्रकरणातील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) दाखल असलेल्या दुहेरी खुन प्रकरणातील (Double Murder Case) आरोपी प्रशांत जगन भोर Prashant Jagan Bhor(वय-25 रा. हिंजवडी माण रोड, हिंजवडी मुळ रा. जानोरी, पो. असवली ता. इगतपुरी) याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे (District and Additional Sessions Court) न्यायाधीश एस.एस. गल्हाने (Judge S.S. Galhane) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. (Pune Crime News) अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर (Adv. Jitendra Ashok Janapurkar) यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

दाखल गुन्ह्यातील फिर्यादी दत्ता वसंत भोंडवे Dutta Vasant Bhondve (वय-30 रा. दारुंब्रे, ता. मावळ) व मयत हे 9 जून 2018 रोजी रात्री 8:30 व सुमारास डांगे चौक येथून दारूंब्रे येथे जाण्यासाठी मुंबई बेंगलोर हायवेवरून (Mumbai Bangalore Highway) कोयते वस्ती कडे जात होते. त्यावेळी फिर्यादी यांना उलटी आल्यासारखे वाटू लागल्याने त्यांनी रोडच्या कडेला गाडी थांबवून चूळ भरणे करिता खाली उतरले. चूळ भरून पुन्हा गाडीत बसत असताना दोन अनोळखी इसम गाडीच्या मागील सीटवर बसलेले होते.

त्यातील एकाने फिर्यादी यांना चाकू लावून गाडी पुढे घेण्यास सांगून फिर्यादी यांची पत्नी अश्विनी भोंडवे Ashwini Bhondve (वय-27) हिचे रुमालाने तोंड दाबून बेशुद्ध केले. काही अंतर पुढे गेलेनंतर गाडी रोडच्या कडेला घेण्यास सांगून गाडी रोडच्या कडेला घेतल्यानंतर मयत अश्विनी हिचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केला. तसेच मुलगा अनुज भोंडवे Anuj Bhondve (वय-8) याचा देखील रुमालाने तोंड दाबून खून केला. तर फिर्यादी यांच्या डोक्यावर व पाठीवर वार करून फिर्यादी यांना जखमी करून बेशुद्ध पाडून फिर्यादी व त्यांची मयत पत्नी अश्विनी यांचे दोन मोबाईल व सोन्याचे दागिने (Gold Jewelry) घेऊन गेले.

गुन्ह्याच्या तपासात फिर्यादी याच्याकडे केलेल्या सोखोल चौकशीत हा गुन्हा फिर्यादी दत्ता भोंडवे यानेच केल्याचे निष्पन्न
झाले. दत्ता भोंडवे व महिला आरोपी सोनाली जावळे (Sonali Jawle) यांच्यात प्रेम संबंध (Love Affair) होते.
त्यांच्या प्रेम संबंधास व लग्नास अडसर ठरत असलेली फिर्यादी यांची पत्नी अश्विनी भोंडवे व मुलगा अनुज यांना
संपवण्याचे उद्देशाने दत्ता भोंडवे व महिला आरोपी सोनाली जावळे या दोघांनी गुन्ह्यातील इतर आरोपी प्रशांत भोर,
पवन जाधव, सावन जाधव यांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली. त्या पोटी त्यांना ऍडव्हान्स म्हणून काही रक्कम
देऊन ठरलेल्या पूर्व नियोजित कटकारस्थानाप्रमाणे अश्विनी भोंडवे व तिचा मुलगा अनुज यांचा खून केल्याचे
निष्पन्न झाल्याने आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत जगन भोर याने ॲड. जितेंद्र जानापुरकर यांच्यामार्फत जामिनाचा अर्ज जिल्हा व अतिरिक्त
सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाने शिवाजीनगर कोर्ट येथील न्यायालयात दाखल केला. आरोपीचे वकील यांनी बाजू मांडली.
त्याचप्रमाणे आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाने कोर्टाने
आरोपीला अटी व शर्तीवर जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्तालयात ART टेक्नॉलॉजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळणार अत्याधुनिक प्रशिक्षण