Pune Crime News | पुण्यात घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त; चोरीची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर आणि परिसरात घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने (Pune Police Crime Branch) अटक केली आहे. आरोपी नदी व नाल्यावाटे येऊन घरफोडी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 8 लाख 84 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime News)

मुकेश ग्यानसिंग भुरीया, सुनिल कमलिसिंग अलावा, हरसिंग वालसिंग ओसनिया, सुंदरसिंग भयानसिंग भुरीया (सर्व रा. ता. कुक्षी, जि. धार, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.9) रेंजहिल्स ते खडकी पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रोडवरील रेल्वेच्या बोगद्याजवळ केली. (Pune Crime News)

पुणे शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध घेतला जात होता. युनिट चारचे पथक खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना रेल्वेच्या बोगद्याजवळ असलेल्या म्हसोबा मंदिराजवळून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, घरफोडीसाठी लागणारी कटावणी, स्क्रुड्रायव्हर, लोखंडी पाना, कटर, गोफन अशी हत्यारे जप्त केली आहेत. आरोपींनी एप्रिल, मे, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पुण्यात येवून येरवडा, धानोरी, खडकी, विश्रांतवाडी, कोंढवा परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली.

नदी-नाल्यातून येऊन घरफोडी

आरोपी घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे, घातक शस्त्र व दगड भिरकावुन मारण्यासाठी गोफन घेऊन काही कालावधीसाठी पुण्यात येत होते. पुण्यात आल्यानंतर नदी-नाले, दाट झाडी अशा ठिकाणी दिवसाच्या वेळी वास्तव्य करत होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करण्यासाठी बाहेर पडत होते. नदी-नाल्यांच्या कडेने फिरताना व शेजारी असलेल्या अपार्टमेंट किंवा बंगलो सोसायटीत प्रवेश करुन बंद फ्लॅट, बंगलो फोडून चोरी करत होते.

घातक शस्त्राचा वापर

चोरी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर कोणी प्रतिकार केला तर घातक शस्त्राचा वापर करायचा किंवा गोफणचा वापर करुन दगडे मारुन पळून जात होते. आरोपींनी यापूर्वी भाऊ पाटील रोड, बोपोडी, खडकी परिसरातील विविध अपार्टमेंटमध्ये चोऱ्या केल्या आहेत. आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार,
पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, प्रविण भालचिम, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, संजय आढारी,
विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, वैभव रणपीसे, अशोक शेलार, रमेश राठोड, वैशाली माकडी, मनोज सांगळे,
शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आहे म्हणत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 18 लाखांचा गंडा

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम