Pune Crime News | अपहरण करुन खून करणाऱ्या फरार आरोपीच्या लोणीकंद पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीत दोन वर्षापूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील (Murder Case) फरार आरोपीला लोणीकंद पोलिसांच्या सायबर तपास पथकाने (Cyber Investigation Team) अटक केली आहे. आरोपी दोन वर्षापासून खेड तालुक्यातील बहुळ या गावात लपुन राहत होता. पथकाने बहुळ गावात (Pune Crime News) सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सचिन बाळु वारघडे (वय-30 रा. ढेरंगे वस्ती, कोरेगाव-भिमा ता. शिरुर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात 2020 मध्ये खुनाचा गुन्ह्यासह आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार आरोपी सचिन वारघडे याचा सायबर तपास पथकाकडून चाकण, आळंदी भागात शोध घेतला जात होता. त्यावेळी आरोपी खेड तालुक्यातील बहुळ गावात लपुन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बहुळ गावात आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borate), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar),
पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील (Police Inspector Maruti Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर
पोलीस स्टेशन (Cyber Police Station) तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे
(PSI Suraj Kiran Gore), पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, सचिन चव्हाण, मल्हारी सपुरे,
सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | The Lonikand police of the absconding accused who kidnapped and killed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohan Joshi On Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करा ! मोहन जोशी यांची मागणी; न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना