Pune Crime News | पांगरमल दारुकांडमधील मुख्य आरोपी शिवसेनेच्या फरारी जि. प. सदस्य म्हाळुंगेतील कंपनीत सेल्स एक्झिक्युटीव्ह

सीआयडीने केली अटक, सहा वर्षापासून फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | जिल्हा परिषद निवडणुकीत (Zilla Parishad Elections 2017) मतदारांसाठी आयोजित पार्टीत दारु प्राशन केल्यामुळे ९ जण मृत्यु पावले होते़, अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारुकांड (Pangrammal Alcohol Case) म्हणून गाजलेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेनेच्या जि. प. सदस्य भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Govind Mokate) या गेल्या ६ वर्षांपासून फरार होत्या. सीआयडीने (CID) त्यांना अटक केली. विशेष म्हणजे म्हाळुंगे येथील एका नामांकित कंपनीत त्या सेल्स एक्झिक्युटीव्ह (Sales Executive) म्हणून कामाला होत्या. (Pune Crime News)

ही घटना 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घडली होती. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरीता भाग्यश्री गोविंद मोकाटे या जिल्हा परिषद व मंगल महादेव आव्हाड (Mangal Mahadev Avhad) या पंचायत समितीच्या निवडणुकीकरीता शिवसेनेच्या उमदेवार होत्या. 12 फेबु्वारी 2017 रोजी मतदारांना व कार्यकर्त्यांना जेवण व देशी, विदेशी दारु पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये दारु पिल्यामुळे एकूण 9 जणांचा मृत्यु झाला होता, तर, 13जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना अर्धांग वायू व एकास अंधत्व आले आहे. त्यामुळे या प्रकरणात एकूण 20 आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर 19 आरोपींवर 68 इतके गंभीर गुन्हे दाखल असल्याचे त्यांच्यावर मोका लावण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य व राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषणकडे State Criminal Investigation (सीआयडी) कडे देण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील २० पैकी १७ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोघे जण मृत्यु पावले आहेत.
यातील मुख्य आरोपी भाग्यश्री गोविंद मोकाटे (रा. इमामपूर, ता. जि. अहमदनगर) ही जिल्हा परिषद जेऊर
गटातून 2017 मध्ये जि. प. सदस्य म्हणून निवडुन आली. परंतु, त्या मागील 6 वर्षांपासून फरार होत्या.
न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यांच्याविरुद्ध पकड वॉरट व जाहीरनामे प्रसिद्ध करुनही
त्या शरण आल्या नव्हत्या. (Pune Crime News)

भाग्यश्री मोकाटे या पुणे शहरात रहात असून त्या म्हाळुंगे येथील एका नामांकित कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून
कामास असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. त्यानुसार सापळा रचून तिला 27 ऑगस्ट रोजी पकडण्यात आले.

ही कामगिरी अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे (Additional Director General of Police Prashant Burde),
विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपूरे (Special Inspector General of Police Sanjay Yenpure),
पोलीस अधीक्षक पल्लवी बर्गे (Superintendent of Police Pallavi Berge) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक आनंद रावडे (PI Anand Rawde), हवालदार विकास कोळी (Constable Vikas Koli),
सुनिल फकिरप्पा बनसोडे, उज्वला डिंबळे, पोलीस नाईक कदम यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

01 September Rashifal : मिथुन, कर्क आणि सिंह राशीच्या जातकांना होणार धनलाभ, मिळेल नशीबाची साथ

Rules Changed From 1 September 2023 | १ सप्टेंबरपासून बदलले हे नियम, आयपीओपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमात झाला बदल