Pune Crime News | जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्यांच्या येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने आवळल्या मुसक्या

0
374
Pune Crime News | The Yerwada police investigation team of those who absconded after trying to kill their lives
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नवी खडकी परिसरात शनिवारी (दि.4) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा करून पसार झालेल्या आरोपींना येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. (Pune Crime News)

 

प्रफुल्ल उर्फ कान्या दिपक सोनवणे (30) आणि आशिष उर्फ सोनू शंकर मोरे (25, दोघे रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी शनिवारी रात्री येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवी खडकी परिसरात फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी हे फरार झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तपास पथकास सूचना केल्या होत्या. (Pune Crime News)

 

सदरील गुन्हयाचा तपास करताना तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, ASI प्रदिप सुर्वे,
पोलिस अंमलदार राहुल परदेशी आणि गणपत थिकोळे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली.
पोलिस पथकाने आरोपींचा माग करून त्यांना पकडले. उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहाय्यक आयुक्त किशोर जाधव (ACP Kirshor Jadhav), वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम (Sr PI Balkrishna Kadam),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे (PI Uttam Chakkre) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे,
सहाय्यक उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, हवालदार गणपत थिकोळे, तुषार खराडे, पोलिस नाईक अमजद शेख, किरण घुटे,
सागर जगदाळे, कैलास डुकरे, पोलिस अंमलदार अनिल शिंदे, राहुल परदेशी आणि सुरज ओंबासे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | The Yerwada police investigation team of those who absconded after trying to kill their lives

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mundhwa Premier League Cricket Tournament |‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

Ahmednagar ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस