Pune Crime News | भाडेकरुने बनावट दस्त तयार करुन फ्लॅट बळकाविण्याचा केला प्रयत्न; वकीलासह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | भाड्याने फ्लॅट रहायला दिला असताना वकिलाला हाताशी धरुन जुन्या स्टॅम्पपेपरवर बनावट दस्त तयार करुन फ्लॅट बळकविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी गुरुनानकनगर येथे राहणार्‍या एका ६० वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) फिर्याद (गु. रजि. नं. २३६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रियाज मोहम्मद हुसैन शेख (वय ५२) मुमताज रियाज शेख (वय ५०, दोघे रा. गंगा अव्हेन्यू) आणि अ‍ॅड. सुधीर श्रावण सोनवणे (वय ५५, रा. साईनाथ नगर, पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार उंड्री येथील रोजवुड सोसायटीत १५ जून ते १८ जुलै २०२२ व १० जानेवारी २०२३ मध्ये घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीचा फ्लॅट आरोपी रियाज शेख याला १०
फेब्रुवारी २०२२ ते ९ जानेवारी २०२३ असा ११ महिन्यांच्या लिव्ह अँड लायसन्स रजिस्टर करार करुन दिला होता.
शेख याने नोटरी करणारे वकिल सोनावणे यांना हाताशी धरुन २०१९ सालचे ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपरवर ११ डिसेबर
२०१६ ते १२ डिसेबर २०२३ असे ६० महिन्यांचे बनावट लिव्ह अँड लायसेन्स नोटराईज अ‍ॅग्रीमेंट बनवले.
त्यामध्ये फिर्यादीचे फ्लॅटसाठी ३० लाख रुपये रोख दिल्याचे खोटे नमूद केले.
या दस्तावर फिर्यादीचा एकत्रित फोटो लावून दस्त करताना फिर्यादी हजर नसताना,
त्यावर फिर्यादी व फिर्यादीचे पती यांच्या बनावट सह्या करून खोटा दस्तऐवज बनवून फिर्यादीची फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Trying to make a flat with a fake document by the tenant; A crime lodged on the three with a notary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मित्राच्या मदतीने शारीरीक संबंधाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची दिली धमकी

Yavatmal Crime News | पाणी काढायला सांगून पत्नीला विहिरीत ढकलून केला खून

Beed Crime News | दहावीची परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार