Pune Crime News | महिलांसोबत अश्लिल संभाषण करणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील विविध भागातील उच्चभ्रु महिलांच्या मोबाईवर फोन करुन त्यांच्यासोबत अश्लील संभाषण (Obscene Conversation) करणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक (Arrest) करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. ही कारवाई (Pune Crime News ) शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station) तपास पथकाने गाझियाबाद (Ghaziabad) परिसरात केली.

चेतन मासी दासी Chetan Masi Dasi (वय-32 रा. वीरेंद्रनगर, दिल्ली) त्याची साथीदार कविता अनिल शर्मा Kavita Anil Sharma (वय-22 रा. उत्तमनगर, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे शहरातील उच्चभ्रु भागात राहणाऱ्या महिलांचे क्रमांक मिळवून आरोपी चेतन दासी त्यांच्यासोबत अश्लील संवाद साधत होता. तसेच वेगवेगळी आमिषे दाखवत होता. (Pune Crime News)

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता आरोपी दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव (PSI Manisha Jadhav), रुपेश वाघमारे (Rupesh Waghmare), आदेश चलवादी (Adesh Chalawadi) यांचे पथक दिल्लीला रवाना करण्यात आले. पथकाने दिल्लीतील 250 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपी गाझियाबाद येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने गाझियाबाद येथे आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 9 मोबाईल आणि सीमकार्ड जप्त केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल
(DCP Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार (ACP Gajanan Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane), पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (Police Inspector Vikram Goud), उपनिरीक्षक मनीषा जाधव, पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Two arrested from Delhi for having obscene conversation with women, Shivajinagar police action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohan Joshi On Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करा ! मोहन जोशी यांची मागणी; न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना