Pune Crime News | दोघांवर तलवार, कोयत्याने वार, जनता वसाहत परिसरात दहशत माजवणाऱ्या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कार्यक्रमानंतर खुर्च्यांची आवराआवर करत असताना एका टोळक्याने तरुणावर तलवारीने वार केले. तर एका महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील जनता वसाहत येथील वाघजाई मित्र मंडळाजवळ सोमवारी (दि.23) रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करुन तीन जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत ऋषीकेश उर्फ चेतन शरद पवार (वय-23 रा. वाघजाई मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत, पुणे) याने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलिंद सुधीर कवडे (वय-19), शुभम नारायण मोरे (वय-19), संकेत श्रीकांत घाणेकर (वय-19) आणि दोन अल्पवयीन मुले (सर्व रा. जनता वसाहत, पुणे) यांच्यावर आयपीसी 307, 143, 144, 147, 148, 149, 504, 506 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट, क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मिलिंद, शुभम आणि संकेत यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघजाई मित्र मंडळाजवळ होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमानंतर फिर्यादी हे खुर्च्यांची आवराआवर करत होते. त्यावेळी आरोपी हातात तलवार व कोयते घेऊन आले.
आरोपी मिलिंद कवडे याने कोणतेही कारण नसताना ऋषीकेश पवार याच्या डोक्यात तलवारीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. मात्र त्याने हा वार चुकवला.
आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या इतर मित्रांना शिवीगाळ करुन मंडळातील सर्वांना मारुन टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी याच्या घराजवळ राहणाऱ्या संगीता आवताडे या महिलेच्या डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी केले. (Pune Crime News)

दरम्यान, रविवारी (दि.22) रात्री पावणे बारा वाजता मंडळाचे कार्यकर्ते हे दुचाकी वाहनांना रस्ता काढून देत होते.
त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्याठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते व आरोपी यांच्यात बाचाबाची झाली होती.
त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना तिथून हाकलून दिले होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | उद्या मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णयाची शक्यता कमीच, फडणवीसांचे संकेत; म्हणाले…

Pune Water Supply News | पुण्यातील काही भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद

MCA Joins Hands With Punit Balan Group | एमसीएचा महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाला चालना देण्यासाठी पुनित बालन ग्रुपसोबत करार