Pune Crime News | फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खडकवासला येथे फिरायला जावू असे सांगून एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नांदेड सिटी परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार (Minor Girl Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 25 वर्षाच्या तरुणावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते मंगळवारी (दि.10) सकाळी साडे नऊच्या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या आईने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी हा गुन्हा सिंहगड रोड पोलिसांकडे (Pune Police) वर्ग केला आहे. सिंहगड पोलिसांनी आशिष राजेंद्र ताकतोडे Ashish Rajendra Taktode (वय-25 रा. सिंहगड रोड, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/आय/जे/के, 354अ, 354ड, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 16 वर्षाच्या मुलीसोबत ओळख वाढवली.
सप्टेंबर 2022 मध्ये तिला खडकवासला येथे फिरण्यास जाऊ असे सांगून तिला घेऊन गेला.
आरोपीने फ्रेश होण्याचे कारण सांगून मुलीला नांदेड सिटी परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला.
त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
तसेच तिला बदनामी व लग्न केले नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार समजता फर्यादी यांनी
बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी हा गुन्हा सिंहगड रोड पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोहार (PSI Lohar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाच घेताना महिला दुय्यम निबंधक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap On Two Police Officers | 1 लाख रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, पोलिस उपनिरीक्षक (PSI) देखील गोत्यात, 2 अधिकार्‍यावरील कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ

42 मुलांना सैन्यदलात नोकरी देण्याच्या आमिषाने 2 कोटींची फसवणूक, कोंढवा परिसातील प्रकार