Pune Crime News | विश्रांतवाडी: टिंगरेनगरमध्ये वडिलाचा मुलाने केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | काम धंदा करत जा चांगला रहात जा असे सांगणार्‍या वडिलांच्या छातीत कात्रीने मारुन त्यांचा खून (Murder in Pune) केल्याची घटना समोर आली आहे. (Pune Crime News)

लक्ष्मण मंजुळे (वय ५५, रा. टिंगरेनगर) असे खून (Pune Murder Case) झालेल्या वडिलांचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी (Pune Police) मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे Shivnath Laxman Manjule (वय २०) याला अटक केली आहे. ही घटना टिंगरेनगरमध्ये सोमवारी पहाटे दीड वाजता घडली.

याबाबत बाबु रामु दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६५/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवनाथ मंजुळे हा अकरावीपर्यंत शिकला असून सध्या काही कामधंदा
करत नाही. लक्ष्मण मंजुळे हेही आजारी असतात. ते शिवनाथ याला नेहमी काही तरी कामधंदा करत जा.
अंघोळ करत जा, चांगला राहत जा असे बोलत असत. त्यावरुन त्यांच्यात वारंवार वाद होत असत.
मंजुळे यांची विवाहित मुलगी सध्या त्यांच्याकडे आली आहे.
सोमवारी रात्री सर्व जण झोपले असताना शिवनाथ याने घरातील कात्री घेऊन झोपलेल्या वडिलांच्या छातीत व
पोटात खुपसली. त्यांच्या ओरडण्याने त्याच्या आईला जाग आली.
तिने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, त्यात कात्री हाताला लागून त्याही जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी शिवनाथ याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक माळी (Assistant Police Inspector Mali) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

19 September Rashifal : वृषभ आणि मिथुन राशीवाल्यांसाठी दिवस धावपळीचा, वाचा दैनिक भविष्य

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण, लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी