Pune Crime News | आर्मीत अधिकारी असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक, महिलेची 16 लाखाची फसवणूक करणाऱ्या भामट्याला खंडणी विरोधी पथक-2 कडून अटक

Pune Crime News | who cheated many people by claiming to be an army officer, cheated a woman of 16 lakhs, arrested by Anti-Extortion Squad-2
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लष्करी गणवेश (Military Uniform) घालून मोठ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे सांगून तरुणांना लष्करात भरती (Army Recruitment) करतो, असे सांगून आर्थिक फसवणूक (Fraud Case) तसेच महिलेचे शोषण करुन तिच्याकडून 16 लाख रुपये लुबाडणाऱ्या भामट्याला बेड्या (Arrest) ठोकण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक-2 (Anti Extortion Cell), पुणे शहर व मिलिटरी इंटेलिजन्स (Military Intelligence), सदर्न कमांड (Southern Command), लायझन यूनिट (Liaison Unit), पुणे यांच्या संयुक्त कारवाईत भामट्याला अटक करण्यात आली. (Pune Crime News)

प्रमोद भिमराव यादव Pramod Bhimrao Yadav (वय-27 रा. अमृतवाडी, ता. जत, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने भारतीय सैन्य दलात (Indian Army) अधिकारी असल्याचे भासवून एका महिलचे शोषण करुन तिच्याकडून 16 लाख रुपये लुबाडून फेसवणूक केल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) आयपीसी 406, 420, 376 (2) (एन), 377 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

आरोपीने 8 ते 9 तरुणांना सैन्यात भरती करतो असे सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती आर्मी इंटेलिजन्स, सदर्न कमांड, लायझन युनिट पुणे यांना मिळाली. आरोपीचा शोध घेण्यासाठी खंडणी विरोधी पथक-2 व मिलिटरी इंटेलिजन्स यांचे एक पथक तयार करण्यात आले. आरोपीचा तांत्रिक पद्धतीने सांगोला, जत येथे शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

दरम्यानच्या काळात मिलिटरी इंटेलिजन्स, सदर्न कमांड, लायझन युनिट पुणे यांना संपर्क साधणारे तक्रारदार राहुल अशोक बच्चाव (वय-26 रा. नांदगाव) व इतर आठ जणांकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीने आर्मी युनिफॉर्म परिधान करुन बनावट ओळखपत्र दाखवले. तसेच स्वत: सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी व इतरांना आर्मीत भरती करतो असे आश्वासन देऊन त्यांना भरती झालेबाबतची बनावट मेरीट लिस्ट पाठवून 28 लाख 88 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी कोंढावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीची चार लग्न

आरोपीने आतापर्यंत चार लग्न केल्याची माहिती मिळत आहे. आरोपी हा माजी सैनिकाचा मुलगा आहे. त्यालाही सैन्य दलात भरती व्हायचे होते. मात्र, लष्करात भरती होऊ न शकल्याने घरातल्या सदस्यांना अंधारात ठेवून लष्करी सेवेत असल्याचे त्याने भासवले. आरोपीने अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २. सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर
(PI Pratap Mankar), सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane),
पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Srikant Chavan), मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav)
व पोलीस अंमलदार, विजय गुरव, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने,
चेतन शिरोळकर व आर्मी इंटेलिजन्स, सदर्न कमांड लायझन युनिट, पुणे तसेच तांत्रीक विश्लेषण, गुन्हे शाखा,
पुणे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | who cheated many people by claiming to be an army officer, cheated a woman of 16 lakhs, arrested by Anti-Extortion Squad-2

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall

Total
0
Shares
Related Posts