Pune Crime News | पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून पत्नीने केला जीवे मारण्याचा प्रयत्न; शिवणेमधील घटना, भावाच्या सांगण्यावरुन केले कृत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भावाला दिलेले उसने पैसे परत मागितल्याने त्याच्या सांगण्यावरुन पत्नीने झोपलेल्या पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. या घटनेत महादेव अर्जुन जाधव (वय ३०) हे गंभीर भाजले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime News)

 

वारजे पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) कविता महादेव जाधव Kavita Mahadev Jadhav (वय २८, रा. काजल हाईटस, शिवणे) हिच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार शिवणे येथे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता घडला. या घटनेनंतर कविता जाधव या पळून गेल्या आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव जाधव यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. शहरातील विविध ठिकाणच्या आठवडी बाजारात ते भाजीपाला विक्री करत असतात. त्यांची सासुरवाडी अहमदनगर येथे नालेगाव वारुळा येथे आहे. त्यांचा मेहुणा गोरख छगन राठोड (Gorakh Chhagan Rathod) हा तेथे रहात असतो. त्याला गावाकडे घर बांधायचे होते, म्हणून त्याने जाधव यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख ४० हजार रुपये घेतले होते. जाधव यांना गावाकडे जमीन खरेदी करायची असल्याने त्यांनी मेव्हणा गोरख राठोड याच्याकडे पैसे मागत होते. ११ जुलै रोजी दुपारी ते घरी असताना फोन करुन मेव्हण्याकडे पैसे मागत होते. (Pune Crime News)

 

त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने जाधव रागविले.
त्यावरुन त्यांची व पत्नी कविता यांच्यात वादावादी झाली होती.
१२ जुलै रोजी सकाळी पत्नीचा लहान भाऊ नवनाथ राठोड
याने पत्नीच्या मोबाईलवर फोन करुन सांगितले की तुझा नवरा मला सारखे पैसे मागतोय.
तु त्याला जाळून टाक आणि तू गावाला निघून ये, असे बोलत होता. ते फिर्यादी यांनी समक्ष ऐकले.
त्यानंतर फिर्यादी हे दिवसभर काम करुन रात्री जेवण करुन झोपले होते.
त्यावेळी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास अचानकपणे
कविता हिने गरम पाणी त्यांच्या अंगावर टाकले. जाधव हे भाजले असताना ती पळून गेली.
त्यांचा भाऊ सुरेश याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असून तेथे उपचार करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाबर (API Babar) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime News | Wife tried to kill her husband by pouring boiling water on him; The incident in Shivane,
the act was done at the behest of the brother

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा